नोएडातील वादग्रस्त ट्विन टॉवर हे रविवारी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे अवघ्या काही दिवसांत कोसळले. 100 मीटर इतकी उंची असणा-या या इमारती जमीनदोस्त करण्यात आल्याची देशातील ही पहिली घटना आहे. ही घटना ताजी असतानाच अनिल परब यांचे अनधिकृत रिसॉर्टही अशाच पद्धतीने तोडण्याची मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.
किरीट सोमय्या यांची मागणी
अनिल परब यांच्या दापोलीतील वादग्रस्त साई रिसॉर्टवर कारवाई करण्याची मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून गेल्या अनेक महिन्यांपासून करण्यात येत आहेत. आता याबाबत त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून परब यांच्या रिसॉर्टवर कारवाई करण्यासाठी सोमय्या स्वतः दापोलीत दाखल झाले आहेत. हे रिसॉर्ट पाडण्यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यासाठी आणि एजन्सीची निवड करण्यासाठी रत्नागिरी जिल्हाधिका-यांनी बैठक आयोजित केली आहे.
Ratnagiri Collector has arranged Meeting tomorrow to finalize timetable & agency for Demolition of Anil Parab Resorts
Maha Govt will born expenditure of Demolition
I suggested collector to use modern technology for demolition as it's used for demolition of Noida Twin Tower. pic.twitter.com/QvgU4PJhpQ
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 28, 2022
हे रिसॉर्ट पाडण्याचा खर्च महाराष्ट्र सरकारच्या मार्फत करण्यात येणार आहेत. नोएडातील ट्विन टॉवर पाडण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता, तसेच तंत्रज्ञान अनिल परब यांचे रिसॉर्ट जमीनदोस्त करण्यासाठी वापरावे, अशी मागणीही सोमय्या यांनी ट्वीटच्या माध्यमातून जिल्हाधिका-यांना केली आहे.
#NOIDA ka #TwinTower टूटा #AnilParab ka #Dapoli #TwinResort टूटेगा ! @BJP4India @Dev_Fadnavis @mieknathshinde @BJP4Maharashtra pic.twitter.com/t0fQ4FoGYl
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 28, 2022
राज्य सरकारच्या माध्यमातून हे रिसॉर्ट पाडण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. पर्यावरणाच्या नियमांचा भंग करत हे रिसॉर्ट बांधण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community