मंगळवारी पत्रकार परिषद घेत, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपाच्या नेत्यांवर आरोप केले, तसेच भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांना टार्गेट करत, आपल्या स्टाईलने टीका केली. किरीट सोमय्यांना जोड्याने मारले पाहिजे असंही वक्तव्य राऊतांनी केलं. आता राऊतांच्या आरोपांना प्रतिआव्हानं देत, बुधवारी किरिट सोमय्या यांनी सांगितले की, 19 बंगल्यांचा टॅक्स रश्मी ठाकरे भरत आहेत, तेच चोरीला कसे गेले, असा सवाल करत त्यांनी जर रश्मी ठाकरे यांनी ते बंगले आमचे नाहीत असं लिहून दिलं, तर मला दोन्ही जोड्यांनी मारा असं म्हटलं आहे.
..मग घरपट्टी का भरली
भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, घर नाही तर घरपट्टी का भरतात. याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं. मुख्यमंत्री झाल्यानंतर घरपट्टी भरली गेली आहे. त्याचं 5.42 लाख असं ग्रामपंचायतीनं व्हॅल्युएशन दाखवलं आहे. 2008 मध्ये जाऊन घरं बांधून झाली. तुम्ही एग्रीमेन्ट 2014 मध्ये केलं. मुख्यमंत्र्यांनी 12 नोव्हेंबर 2020 ला प्रॉपर्टी टॅक्स भरल्यानंतर, ती घरं चोरीला गेली का, असा सवाल त्यांनी केला आहे. शिवाय मी 12 महिन्यांपूर्वीच घरं चोरीला गेल्याची तक्रार केली. मग आता घरं नाहीत, अशी नाटकं का करता. ठाकरेंच्या पत्नीनं, रवींद्र वायकरांनी, घोस्ट घरं दाखवून कोट्यवधी लाटले असा आरोपही सोमय्यांनी केला आहे.
( हेही वाचा: बापरे! राज्यात इतक्या शाळा ‘अनधिकृत’! अशी ओळखा अनधिकृत शाळा )
कोविड घोटाळ्याची भीती
दरम्यान, यावेळी किरीट सोमय्या यांनी कोवीड सेंटरमध्ये झालेल्या घोटळ्याची चौकशी करण्याची मागणी सोमय्या यांनी केली. कोवीड सेंटरमधील घोटाळ्याच्या चौकशीची भिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना वाटत असल्याचे सोमय्या म्हणाले. मी महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेसाठी लढत आहे. मला जर ब्लॅकमेलर म्हणत असतील, तर चुकीचे आहे असे सोमय्या म्हणाले.