भाजपा नेत किरीट सोमय्या आणि शिवसेना यांच्यातील वाद दिवसेंदिवस अधिकच आक्रमक होताना दिसत आहे. बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा आरोप केले आहेत. मी आजवर कधीही कुठलीही नशा केली नाही. पण ठाकरे सरकारच्या ठोकशाहीला ठोकण्याची नशा आहे, असे सांगत किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा राज्यातील ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
(हेही वाचाः आमदार अमित साटम यांनी संजय राऊत यांना दिले आव्हान! म्हणाले…)
नशा आहे ती ठाकरे सरकारच्या ठोकशाहीला ठोकण्याची
संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला किरीट सोमय्या यांनी चेख प्रत्युत्तर दिले आहे. मी आजवर कधीही विडी, सिगारेट, दारु यांची नशा केली नाही. इतकंच काय तर कधी साधं अंड देखील खाल्लं नाही. पण आता मला नशा आहे ती ठाकरे सरकारच्या ठोकशाहीला ठाकून काढण्याची, नशा आहे ठाकरे सरकारच्या माफियागिरीला संपवण्याची, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी राज्यातील 12 कोटी जनतेचे लुटलेले पैसे मिळवून देण्याची माझ्यात नशा आहे, असे किरीट सोमय्या यावेळी म्हणाले.
ठाकरे पिता-पुत्रांवर केले गंभीर आरोप
भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले. कोविड सेंटरच्या निविदेत भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. कोविड रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचे काम आदित्य आणि उद्धव ठाकरे यांनी केले असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. वडील आदेश देतात की त्या कंपनीला काम देऊ नका, पण त्यांचेच पुत्र आदित्य ठाकरे त्या कंपनीला काम देत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी यावेळी केला.
(हेही वाचाः लता दिदींच्या स्मृती स्थळासाठी शिवाजी पार्कात ‘या’ सहा ते सात जागांचे पर्याय…)
Join Our WhatsApp Community