नवाबचे दाऊदशी, तर उद्धव ठाकरेंच्या पार्टनरचे कसाबशी संबंध; किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

87

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आता ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला आहे. अप्लसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंधित व्यक्तींशी संबंध तर उद्धव ठाकरे यांच्या पार्टनरचे कसाबशी संबंध असल्याचा, खळबळजनक आरोप सोमय्यांनी केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुण्यात मंगळवारी पत्रकार परिषद घेत हा आरोप केला आहे.

पाकिस्तानातून आलेल्या कसाबशी झुंज देताना, पोलीस अधिकारी हेमंत करकरेंचा मृत्यू झाला होता. कसाबने तर गोळ्या घातल्याच, पण करकरेंनी जे बुलेटप्रुफ जॅकेट घातले होते. ते बोगस होते. बिमल अग्रवाल यांच्या कंपनीने हे जॅकेट पुरवले होते. याच बिमल अग्रवाल यांच्याशी बिमल अग्रवाल यांच्याशी श्रीधर पाटणकरांचे व्यावसायिक संबंध असून, पाटणकर हे उद्धव ठाकरेंचे मेहुणे आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि परिवाराचे व्यावसायिक संबंध असलेल्यांनी हेमंत करकरेंची हत्या केल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

ठाकरे परिवार कोणाकोणाचे पार्टनर

महाराष्ट्राची जनता विचारत आहे, सांगा ठाकरे पार्टनर कोणाकोणाचे?  पुढचे एपीसोड मी हळूहळू महाराष्ट्रासमोर मांडणार आहे. रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, उद्धव ठाकरे, श्रीधर पाटणकर, हे लोक कोणाकोणाचे पार्टनर आहेत? ते लवकरच मी महाराष्ट्राच्या समोर आणणार आहे. ठाकरे यशवंत जाधवचे पार्टनर की नंदकिशोर चतुर्वेदी हवाला एन्ट्री ऑपरेटरचे आहेत, असे सोमय्या यावेळी म्हणाले.

( हेही वाचा: तब्बल 20 कोटी डोस कच-यात )

यशवंत जाधव हे उद्धव ठाकरेंचा राईट हॅंड

शिवसेनेचे यशवंत जाधव हे उद्धव ठाकरेंचा राईट हॅंड समजले जातात. हे मुंबई महापालिकेचे पाच वर्ष स्थायी समितीचा अध्यक्ष असून, त्यांनी एक हजार कोटींच्या आसपास माया जमवली असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. ते म्हणाले, बिमल अग्रवाल आणि यतीन यशवंत जाधव यांची रजिस्टर्ड पार्टनरशिप कंपनी आहे. समर्थ इरेक्टर्स अॅंड डेव्हलपर्स. याच कंपनीने आत्ता मलबार हिलमध्ये 80 कोटी रुपयांचा प्रोजेक्ट विकत घेतला. यतीन हा यशवंत जाधवांचा मुलगा आहे. मुंबई महापालिकेच्या एका सर्टिफिकेटनुसार, समर्थ इरेक्टर्सकडून श्रीधर पाटणकर यांनी टीडीआर विकत घेतला आहे. म्हणजेच बिमल अग्रवाल यांच्याकडून.. बोगस बुलेटप्रुफ जॅकेट देणा-याकडून श्रीधर पाटणकरांनी टीडीआर विकत घेतला आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.