असली-नकली कोण? सोमय्यांच्या निशाण्यावर आता रश्मी ठाकरे!

गेल्या दोन दिवसांपूर्वी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुलगा तेजस ठाकरे यांच्यावर मनी लाँड्रिंग केले असल्याचा आरोप केला होता. यानंतर सोमय्यांनी ऱश्मी ठाकरे यांनी 23 मे 2009 रोजी राज्य सरकारला दिलेल्या पत्राचा उल्लेख केला होता. आता मुख्यमंत्री ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे यांचे कोर्लईत बंगले अस्तित्वात होते. असे कागदपत्रे किरीट सोमय्यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. ही कागदपत्रे शेअर करताना त्यांनी असली कोण आणि नकली कोण असा सवालही उपस्थित केला आहे.

(हेही वाचा – CBI raid: काँग्रेसचे नेते पी चिदंबरम यांच्या 8 ठिकाणांवर सीबीआयचे छापे)

काय केले सोमय्यांनी ट्वीट?

असली नकली, 2019 मध्ये रश्मी उद्धव ठाकरे म्हणतात कोर्लई अलिबाग मध्ये 19 बंगलो अस्तित्वात होते/आहे. 2021 मध्ये रश्मी उद्धव ठाकरे म्हणतात 19 बंगलो अस्तित्वात नाही/ नव्हते. खरे कोण ! खोटे कोण ! 2019 च्या रश्मी ठाकरे असली की 2021 च्या रश्मी ठाकरे असली? असली कोण नकली कोण? , असे ट्विट करत सोमय्यांनी दोन कागद पत्रे शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे.

काय केले सोमय्यांनी आरोप?

रश्मी ठाकरे यांचे कोर्लईत बंगले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. यावेळी ते म्हणाले, २०२० मध्ये बंगल्यांचा कर रश्मी ठाकरेंनी भरला. २०१९ पासून त्यांनी हा कर भरला. बंगल्यासंदर्भात २०२१ चे पत्र आहे. त्यामध्ये रश्मी ठाकरेंनी माझ्याकडे १९ बंगले नव्हतेच, आम्ही जागा घेतली तेव्हाही बंगले नव्हते असे म्हटले. आता यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण द्यावं. माईकवर एवढे बोलता मग हेसुद्धा सांगा की रश्मी ठाकरे या खोट्या की उद्धव ठाकरे? लबाडी कोण करत आहे? असा सवाल देखील सोमय्यांनी उपस्थित केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here