भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. कधी कनिष्ठ तर कधी वरिष्ठ, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय या सगळ्यांकडून सारख्या चपराक खाऊन उद्धव ठाकरे यांचे दोन्ही गाल सूजले आहेत. उद्धव ठाकरेंना दोनच गाल आहेत. पण ते तरी किती चपराक खाणार, अशा खोचक शब्दांत किरीट सोमय्या मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे.
(हेही वाचा – “…ही स्टंटबाजी सोडून द्या”, राज ठाकरेंना मिळालेल्या धमकीपत्रानंतर राऊतांचा टोला)
ठाकरे सरकार अजून किती चपराक खाणार
दरम्यान, गुरूवारी सोमय्या यांना खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची भेट घेतली. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी राजद्रोहाचं कलम स्थगित केले आहे. ठाकरे सरकारने राणा दाम्पत्याविरोधात हेच कलम लावले होते. यावरून ठाकरे सरकारला न्यायालयाने चपराक दिल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी देखील मुंबई सत्र न्यायालयाने राजद्रोहाचा कलम योग्य नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे ठाकरे सरकार अजून किती चपराक खाणार, असा प्रश्न देखील सोमय्यांनी यावेळी विचारला आहे.
‘उद्धव यांना दोनच गाल’
दरम्यान, राणा दाम्पत्याने उद्घव ठाकरे यांना आव्हान देत नवी दिल्लीत 14 मे रोजी हनुमान चालिसा पठण करणार असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. पोलीस कमीशर संजय पांडे यांचा वापर उद्घव ठाकरे सरकार माफियाप्रमाणे करत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. परंतु न्यायालयाने सरकारला त्यांची जागा दाखवल्याचे सांगत सोमय्या म्हणाले, मुख्यमंत्र्यांचे गाल दोनच. कधी कनिष्ठ, कधी सत्र न्यायालय कधी उच्च न्यायालय तर कधी सुप्रीम कोर्ट… किती चपराक मारणार, त्यांचे गाल पाहिले.. किती सूजले आहेत. आता ते माफिया पोलीस कमीशर कुठे आहेत? संजय पांडे साहेब, हिमत असेल सुप्रीम कोर्टाला जाब विचारा. राजद्रोहाचे कलम सुप्रीम कोर्टान निरस्त केले. आता उद्धव ठाकरे सरकार काहीही करू शकत नाही, असं किरीट सोमय्या म्हणाले.
Join Our WhatsApp Community