मागच्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. आता किरीट सोमय्या हे संपूर्ण सोमय्या कुटुंबासोबत मुलुंड पोलीस स्टेशनला पोहोचले. सामनाच्या संपादकीय लेखात आपल्याविरोधात अपशब्द वापरण्यात आले, असा आरोप सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी केला आहे. मुंलुडच्या नवघर पोलिसांत एफआयआर अर्ज मेधा सोमय्या यांनी दाखल केला आहे. त्यांच्यासोबत त्यांचे वकील तसेच भाजपाचे कार्यकर्तेही होते.
पोलिसांना चॅलेंज आहे कारवाई करावी
तक्रार दाखल केल्यानंतर, सोमय्या म्हणाले की, नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. प्रोफेसर डाॅक्टर मेधा किरीट सोमय्या यांनी राऊतांविरोधात भादंवि 503,506, 509 याअंतर्गत एफआयआर रजिस्टर करावी. 35 वर्षे शिक्षण क्षेत्रात त्या आहेत. भोंगा राऊत यांनी त्यांचे चारित्र्यहनन केले. सोमय्या परिवारावर दडपण आणले. पोलिसांना चॅलेंज आहे. नौटंकी बंद करा. एफआयआर दाखल करणार नाही, त्या पोलिसांवर कारवाई करणार असे संजय पांडे म्हणाले. आता आम्ही एफआयआर दाखल केला आहे. त्यांनी तो करुन घ्यावा, असे किरीट सोमय्या म्हणाले.
( हेही वाचा: मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर गुटख्याची रास )
…म्हणून तक्रार दाखल
जर टाॅयलेट घोटाळा मी केला, तर माझे ठाकरे सरकारला आव्हान आहे, की 100 पैशाचा घोटाळा तर दाखवा, राऊतांवर क्रिमिनल अॅक्शन घ्या. मी पुढच्या आठवड्यात क्रिमिनिल डिफिमेशन केस नोंदवणार असल्याचेही सोमय्या म्हणाले. युवा प्रतिष्ठान स्थापन करुन सोमय्या कुटुंबाने 100 कोटींचा घोटाळा केला, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यावर किरीट सोमय्या आक्रमक झाले असून, आपली आणि आपल्या कुटुंबाची बदनामी, चारित्र्यहननन केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे.