भाजप नेते किरीट सोमय्या हे कोवीड काळात मुंबई महापालिकेत झालेला भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचे सांगत आहेत. यासंदर्भात सोमय्या बुधवारी दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत. यासंदर्भात ट्वीट करत सोमय्या यांनी माहिती दिली आहे. तसेच, कामगार मंत्री सुरेश खाडे यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांना यासंदर्भातील सर्व कागदपत्रे देणार आहोत, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
कोरोना काळात मुंबई महापालिकेत कोट्यवधींचा घोटाळा झाला, अशी तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ईडीकडे केली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करुन ही तक्रार केल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे त्यांच्या या तक्रारीवर ईडी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
( हेही वाचा: Union Budget 2023: काय स्वस्त काय महाग?; जाणून घ्या एका क्लिकवर )
"COVID ki KAMAI"
Exposing One more scam of BMC today.
2.30pm today, I will be meeting Labour Minister Suresh Khade at Mantralaya Mumbai to submit detail complaint @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 1, 2023
ठाकरे सरकारचा 5 हजार कोटींचा घोटाळा
कोविड काळात महापालिका अधिनियमातील विशेष नियमांचा फायदा घेऊन सत्ताधारी शिवसेनेने 5 हजार 724 कोटींचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे. त्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनीही याच मुद्यावरुन उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले होते. भ्रष्टाचाराचे हे कुरण उद्ध्वस्त केल्याशिवाय भारतीय जनता पक्ष गप्प बसणार नाही, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंविरोधात भाजप आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community