‘… अब तांडव होगा!’ मोहीत कंबोज यांच्या नव्या Tweet ने चर्चांना उधाण

93

मनी लॉंड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोन मोठे नेते तुरुंगात आहेत. आता त्यातच भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीचा आणखी एक मोठा नेता तुरुंगात जाणार असे ट्वीट केले आहे. मोहित कंबोज यांच्या ट्वीटमुळे खळबळ माजली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठ नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना भेटणार आहे, असे मोहित कंबोज यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले. दरम्यान, यासंदर्भात त्यांनी ट्विटची मालिका शेअर करत असताना कंबोज यांनी “हर हर महादेव! अब तांडव होगा!”, असे ट्वीट केल्याचे पाहायला मिळाले. या ट्वीटनंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

(हेही वाचा – नाशिकच्या दिंडोरी परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के)

हर हर महादेव! अब तांडव होगा, या ट्वीटमुळे आज नक्की कोणत्या नेत्यावर कारवाई होणार आहे की आणखी कोणत्या बड्या नेताचा घोटाळा ते उघड करणार आहेत याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर याआधी मोहित कंबोज यांनी ट्विटमध्ये अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय पांड्ये, संजय राऊत अशी चार नावांची यादी शेअर करत पाचव्या जागा रिकामी ठेवली आहे. आणि त्याच्या खाली आमचा स्ट्राईक रेट १०० टक्के आहे, असे म्हटले आहे.

सध्या मुंबईतील आर्थर रोज तुरुंगात अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोघेही आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेमक्या कोणत्या नेत्याकडे मोहित कंबोज यांनी इशारा केला आहे, असा सवाल या ट्वीटनंतर उपस्थित केला जात आहे. तर आपण लवकरच पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा पर्दाफाश करणार असल्याचं कंबोज यांनी केलेल्या एका ट्वीट मध्ये म्हटले आहे.”भारत आणि परदेशातील मालमत्तेची यादी, बेनामी कंपन्या, गर्ल फ्रेंड्सच्या नावावरील संपत्ती, मंत्री म्हणून विविध खात्यांमध्ये केलेला भ्रष्टाचार, कौटुंबिक उत्पन्न आणि मालमत्तेची यादी,” या गोष्टींचा पर्दाफाश करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.