विधान भवनात कच-याचा ढिग…

152

राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. हे अधिवेशन पहिल्या दिवसापासूनच वादळी ठरले आहे. विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षावर आक्रमक आहे. आता यातच विधान भवन इमारतीमधील कच-याचे फोटो व्हायरल होत आहेत.

सरकारकडून काय अपेक्षा करायची

विधान भवनाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा असल्याचे फोटो भाजपा नेते, आमदार मिहिर कोटेचा यांनी स्वत: काढले आहेत. विधान भवनाच्या परिसरात असलेल्या या कच-याचे फोटो आमदारांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन ट्विट केले आहेत. सरकार साधे विधान भवनाचा परिसर स्वच्छ ठेवू शकत नाही, तर सरकारकडून सामान्य नागरिकांनी आपला परिसर वा रस्ते स्वच्छ ठेवावा, अशी अपेक्षा कशी काय करावी?, असा प्रश्न विचारला आहे.

विरोधी पक्ष आक्रमक

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वछ भारत अभियानसारखा उपक्रम राबवत साऱ्या देशाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत असतानाच ठाकरे सरकारचे मात्र विधिमंडळातील कचऱ्याकडेच लक्ष्य नसल्याचे मत व्यक्त होताना दिसत आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाचा हा तिसरा दिवस आहे, आणि पहिल्या दिवसापासूनच वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन प्रमुख विरोधी पक्ष भाजपाने सत्ताधारी पक्षाची कोंडी केली आहे. सत्ताधारी नेते आणि विरोधी नेते यांच्यात खडाजंगी रंगलेली पाहायला मिळत आहे.

 ( हेही वाचा :आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना सरकार नोकरी देणार? )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.