मलिकांचा हात वेश्या व्यवसायातही! भाजपचा सनसनाटी आरोप

103

राज्यमंत्री नवाब मलिक यांना बुधवारी ईडीने अटक केले. त्यानंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिकांवर सनसनाटी आरोप केले आहे. ईडीने अटक केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच रंगतंय. दरम्यान, गुरूवारी भाजपच्या मोहित कंबोज यांनी नवाब मलिकांसंदर्भात आरोप करत मोठा गौप्यस्फोट केलाय. भाजप मलिकांच्या राजीनाम्यासाठी मागणी करत मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेऊन मलिकांना फैलावर घेतले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापणार असल्याचे चिन्ह दिसताय. यावेळी कंबोज यांनी मलिकांवर आरोप करत त्यांच्या बेनामी संपत्तीचा हिशेब मांडला आहे.

काय म्हणाले कंबोज…

नवाब मलिक हे डान्सबार चालवायचे, बांगलादेशातून मुली आणायचे आणि वेश्याव्यवसाय करायचे, असा आरोप कंबोज यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात आणखीच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या सगळ्याप्रकरणी आपल्याकडे पुराव्याखातर व्हिडिओही असल्याचे मोहित कंबोज यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – कोठडीनंतरही नवाबांना ‘महा’पाठिंबा, तर राजीनाम्यासाठी भाजपचं आंदोलन)

मोहित कंबोज मलिकांवर आरोप करताना पुढे असेही म्हणाले की, तुम्हाला ऐकून धक्का बसेल, कारण राज्यातला एक मंत्री डान्सबार चालवत होता. बांगलादेशातून मुली आणून मुंबईत वैश्याव्यवसाय आणायचं काम नवाब मलिक करत होते. अशा अनेक मुलींचे आम्ही स्टिंग ऑपरेशन केले आहेत. त्याचे व्हिडिओ आहेत आमच्याकडे.. ज्यात मुलींनी कबूल केलंय की नवाब मलिक जबरदस्ती त्यांच्याकडून मुंबईत हे काम करुन घेत होते. तसेच, लवकरच मी हे सगळे व्हिडिओ येणाऱ्या काळात तपास यंत्रणांना देणार आहे. ही दुःखद गोष्ट आहे. कुर्ल्यात लोक घाबरायचे या गोष्ट बोलायला. एक मंत्री ड्रग्जमध्ये, वेश्या व्यवसायात सामील आहे. त्याच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप आहे. त्याच्याकडे बेनामी आणि भ्रष्टाचारी संपत्ती आहे. हे भयंकर आहे.. आजच्या आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.