राष्ट्रवादीचा मोठा नेता लवकरच तुरुंगात जाणार, असे ट्वीट करत भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी काही दिवसांपूर्वी खळबळ उडवून दिली होती. त्यांचा रोख अजित पवारांकडे असल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. आता त्यांनी बारामती ॲग्रो लिमिटेड संदर्भातील ट्विट करत रोहित पवार यांना टॅग केले आहे. त्यामुळे आणखी एक ‘पवार’ कंबोज यांच्या रडारवर आलाय की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यानंतर राष्ट्रवादीचा आणखी एक मोठा नेता अडचणीत येणार असल्याचे, कंबोज यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. त्यानंतर सोमवारी त्यांनी राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला. ‘बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनीचा मी सखोल अभ्यास करत आहे. त्या संदर्भातील अधिकचे अपडेट लवकरच देईन’, असे ट्विट कंबोज यांनी केले आहे.
https://twitter.com/mohitbharatiya_/status/1561553869586411521?s=20&t=meYxXCIltuyzTZXzGnxiZw
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांची काहीशी मवाळ भूमिका पाहण्यास मिळाली होती.
( हेही वाचा: राऊतांना दिलासा नाहीच; 5 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी )
मोहित कंबोज यांच्या ट्विटला फारसे महत्त्व देण्याचे काम नाही. कंबोज यांनी स्वतः ओव्हरसिज बँकेतील ५२ कोटी बुडवून जनतेला चुना लावला होता. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दल बोलण्याचा कोणताही अधिकार नाही, असे प्रत्युत्तर रोहित पवार यांनी दिले.
Join Our WhatsApp Community