राऊतांचा डोळा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर! असे का बोललो नारायण राणे?

106

नारायण राणे म्हणाले, संजय राऊत यांनी ते स्वत: शिवसेनाप्रमुख असलेल्या अविर्भावात पत्रकार परिषद घेतली. त्यांच्या पत्रकार परिषदेला कुणीही आले नव्हते, अगदी मातोश्रीतून उद्धव ठाकरेही नव्हते कि आदित्य ठाकरे नव्हते. राऊतांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली आहे, त्यांचा डोळा हा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आहे, असा घणाघाती हल्ला केंद्रीय मंत्री, भाजपचे नेते नारायण राणे यांनी केला.

भाषा अशोभनीय 

15 फेब्रुवारीला घेतलेल्या  आंतरराष्ट्रीय परिषदेला उत्तर देण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतली आहे, असा खोचक टोला हाणत राणे यांनी राऊतांनी पत्रकार परिषदेत वापरलेले शब्द एखाद्या वृत्तपत्रकाच्या संपादकाला शोभणारे नव्हते. पत्रकाराला ही शोभणारी भाषा नव्हती. याची आमच्या योग्य त्या यंत्रणेने दखल घेतली आहे. प्रविण राऊत याने ईडीला दिलेल्या मुलाखतीनंतर  राऊत घाबरले आहेत. भाजपवर आरोप केले परंतु कोणेतेही पुरावे दिलेले दिले नाही, असेही राणे म्हणाले.

(हेही वाचा “खोटं, बेशरमपणे बोलणं, रोज उठल्यानंतर आपलं गटार उघडायचं हे राऊतांचे धंदे”)

संजय राऊतांची कुंडली माझ्याकडे

मी कोणाला घाबरत नाही. जो घाबरतो तो वारंवार म्हणतो मी घाबरत नाही. शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली परंतु त्या पत्रकार परिषदेला कोणीही नाही. पत्रकार परिषदेला फक्त नाशिकचे लोक होते. शिवसेनेसाठी पत्रकार परिषद घेतली की स्वत: साठी घेतली हा सवालच आहे. संजय राऊत यांची कुंडली माझ्याकडे आहे. वेळ आल्यावर मी ती बाहेर काढेन, असा इशारा नारायण राणेंनी संजय राऊत यांना दिला.

राऊतांना उपचाराची गरज 

बाळासाहेबांचे आशिर्वाद आहे असे म्हणणारे संजय राऊत शिवसेनेत 1992 मध्ये आला. संजय राऊत यांचा तोल गेला असून त्यांना वैद्यकीय उपचाराची गरज आहे. तसेच संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेणे थांबवावे आणि जे ओढावले आहे, त्याला सामोरे जावे, असा सल्ला नारायण राणेंनी संजय राऊत यांना दिला. तसेच महाराष्ट्रच्या इतिहासातील सर्वात लाचार मुख्यमंत्री सध्याचा आहे. शरद पवार, कॉंग्रेसवर टीका केली आणि आज त्यांच्यासोबत सत्तेसाठी बसले आहे, अशी टीकाही नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.