राज्यात मार्चमध्ये येणार भाजप सरकार, राणेंची नवी तारीख

राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारवर विरोधकांकडून वारंवार टिकास्त्र सोडले जात आहे. यादरम्यान, राज्यात महाविकास आघाडी सरकार पुन्हा कोसळण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. सध्या राज्यात अनागोंदी कारभार सुरू असून भाजपचे सरकार सत्तेत नसल्याने सरकार अस्थिर असल्याचा दावा केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना नारायण राणे म्हणाले की, राज्यातील आघाडी सरकार मार्चमध्ये कोसळणार असून मार्च महिन्यात भाजपचं सरकार येणार आहे.

सरकारचे आयुष्य जास्त नाही

मार्चमध्ये भाजपाचं सरकार येणार आहे. भाजपाचं सरकार आल्यानंतर राज्यात तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल. भाजपचं सरकार नाही त्यामुळे राज्यात अनागोंदी कारभार आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार जास्त काळ टिकणार नाही, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे आयुष्य जास्त नसल्याचा इशारा देत राणे म्हणाले, लवकरात लवकर राज्याच भाजपचं सरकार येईल. एखादं सरकार पाडायचं असेल आणि नवीन सरकार स्थापण करायचं असेल तर काही गोष्टी गुपित ठेवणे गरजेचे असते.

कित्येकदा राणेंनी केली भविष्यवाणी

याआधी देखील नारायण राणे यांनी भाजपमध्ये आल्यानंतर कित्येकदा सरकार कोसळणार अशी भविष्यवाणी केली होती. कधी दिवाळीनंतर सरकार कोसळेल, तर कधी नव्या वर्षा सरकार कोसळेल असं त्यांनी म्हटले होते. परंतु, नारायण राणे यांनी दिलेल्या डेडलाईनमध्ये सरकार काही कोसळले नाही. त्यामुळे राणेंची नवी तारीख आणि भविष्यवाणी केवळ अशीच असल्याची चर्चा आता रंगतांना दिसत आहे.

(हेही वाचा – संपात फूट! ९ हजार एसटी कामगार रुजू)

असे म्हणाले राणे…

महाराष्ट्रात भाजपाचे सरकार नाही त्यामुळे तिथे तसे होत आहे. लवकरात लवकर महाराष्ट्रात भाजपचे सरकार येईल आणि तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल. माझ्या आतमध्ये जी गोष्ट आहे ती आत्ताच बाहेर सांगायची नाही. एखादे सरकार पाडायचे असेल आणि नवे सरकार स्थापन करायचे असेल तर काही गोष्टी गुपित ठेवाव्या लागतात. अशा ठिकाणी काही बोललो तर आणखी एखादा महिना पुढे ढकलेल, असे राज्यसरकार भेद करत असल्याच्या आरोपावर बोलताना राणे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here