राणेंचे राऊतांना प्रतिआव्हान; म्हणाले, ‘तू जिथे म्हणशील तिथे येतो, बघूया’…

119

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना एकटे फिरण्याचे आव्हान दिले होते. नारायण राणे यांनी राऊत यांचे हे आव्हान स्वीकारले आहे. तू म्हणशील तिथे येतो. आताच संरक्षण सोडतो. बघुया काय करतो, असे खुले आव्हानच नारायण राणे यांनी दिले आहे. त्यामुळे राणे आणि राऊत यांच्यातील वाद अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतल्याचा आरोप करुन राणे यांनी खळबळ उडवून दिली आहे.

मला 1990 पासूनच संरक्षण 

राणे पुढे म्हणाले की, कोणाला चॅलेंज देतोय? एकटा फिरा असे मला राऊत चॅलेंज देतो. मी काही सरकारकडे संरक्षण मागितले नाही. 1990 सालापासून मला संरक्षण आहे. मी ज्यांच्याविरोधात लढलो. त्यात बाहेरचे लोक होते. त्यांच्या विरोधात लढलो म्हणून मला 90 सालापासून संरक्षण दिले आहे. पोलिसांनी मला जबरदस्तीने  संरक्षण दिले आहे, असे राणे म्हणाले. मला 1990 सालापासून दिलेले सरंक्षण राऊतांना माहिती नाही, कारण राऊत तेव्हा शिवसेनेत नव्हते. शिवसेनेविरोधात लोकप्रभामध्ये ते लेख लिहित होते. तुम्हाला आज सांगतो. संजय राऊत तू जिथे म्हणशील तिथे येतो. आजच संरक्षण सोडतो, बघूया, असे आव्हानच राणे यांनी संजय राऊत यांना दिले आहे.

( हेही वाचा: कवाडेंना सोबत घेताना मला विचारायला हवे होते; आठवलेंचा मुख्यमंत्र्यांवर आक्षेप )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.