शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे, त्यानिमित्ताने राज्यभरातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांना अभिवादन केले आहे. त्यामध्ये भाजपच्या नेत्यांनीही त्यांना अभिवादन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कायम स्मरणात राहतील, कारण ते सर्व सामान्यांच्या मागे उभे राहिले होते, असे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्ताने त्यांना अभिवादन केले, मी बाळासाहेब ठाकरे यांनी विनम्र अभिवादन करतो. बाळासाहेब ठाकरे हे धडाडीचे नेते म्हणून कायम स्मरणात राहतील, ते कायम सर्ववसामान्यांच्या मागे उभे राहिले होते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
I pay homage to Shri Balasaheb Thackeray on his Jayanti. He will be remembered forever as an outstanding leader who always stood with the people.
— Narendra Modi (@narendramodi) January 23, 2022
तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिंदुहृदयसम्राट श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी सादर नमन.
हिंदुहृदयसम्राट श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी सादर नमन. #BalasahebThackeray pic.twitter.com/iY2WqnMmoe
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) January 23, 2022
तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमचे मार्गदर्शक, प्रखर हिंदुत्ववादी, हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन !, असे म्हटले.
Join Our WhatsApp Communityआमचे मार्गदर्शक, प्रखर हिंदुत्ववादी, हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन !#BalasahebThackeray pic.twitter.com/WAYY5SdWkG
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 23, 2022