लुक्क्यांना जास्त सवय असते स्वतःला वाघ म्हणायची, काय म्हणाले राणे?

आम्ही जंगलात असणाऱ्या वाघाशी दोस्ती करतो, पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही.

चंद्रकांत पाटील हे गोड आहेत. त्यांनी अशाच प्रकारे कार्यकर्त्यांच्या भेटी घेत राहाव्यात. वाघ ठरवेल की मैत्री कुणाशी करायची, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यानंतर निलेश राणे यांनी त्यांना त्याच स्टाईलने उत्तर दिले आहे.

काय म्हणाले निलेश राणे?

नाक्यावरती उभे राहणारे टपोरी पण स्वतःला वाघ समजतात. वाघ-बकरी नावाचा चहा सुद्धा आहे आणि टायगर बाम पण आहे. स्वतःला वाघ म्हटल्यावर वाघ झाले असते, तर जंगलातल्या वाघांची किंमत संपली असती. लुक्क्यांना जास्त सवय असते स्वतःला वाघ म्हणायची, असे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे.

(हेही वाचाः वाघाशी दुश्मनी नव्हतीच! नेत्यांची आज्ञा असेल, तर दोस्ती करू! भाजपची सेनेला ऑफर )

राऊतांच्या टीकेला दादांचे उत्तर

आज माझा वाढदिवस आहे, त्यामुळे कटू बोलायला नको. संजय राऊतांनी मला मनाविरुद्ध का होईना गोड म्हटलंय आणि शुभेच्छा दिल्या आहेत. मनामध्ये जर मी गोड असतो, तर साधारणपणे सामनाचा आठवड्याला एक अग्रलेख माझ्यावर लिहिला गेला नसता. मला काल एका कार्यक्रमात एका कार्यकर्त्याने एक वाघ भेट म्हणून दिला. मी म्हटलं चांगलंय, आमची वाघांशी दोस्ती आहे. तर त्यावर पत्रकारांनी शिवसेनेचा मुद्दा काढला. मी म्हटलं आम्ही दोस्ती करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. पण आम्ही जंगलात असणाऱ्या वाघाशी दोस्ती करतो, पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याच्या बाहेर होता, तोपर्यंत आमची दोस्ती होती. आता तो पूर्णपणे पिंजऱ्यातला वाघ झालाय, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

काय म्हणाले होते राऊत?

संजय राऊत पक्षबांधणीच्या निमित्ताने पाच दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर भाष्य केले. चंद्रकांतदादा गोड माणूस आहे, वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, अशा शुभेच्छा संजय राऊत यांनी दिल्या. नरेंद्र मोदी हे भाजप आणि देशाचे मोठे नेते आहेत. जे यश भाजपला प्राप्त झालं आहे ते त्यांच्या चेहऱ्यामुळेच आहे. पण पंतप्रधान हे देशाचे असतात, त्यांनी राजकीय प्रचार करू नये. कोणत्याही पक्षाचा प्रचार करू नये, ते देशाचे पंतप्रधान आहेत. फोटो वापरणे हे कार्यकर्त्यांवर असतं. बाळासाहेबांचा फोटो वापरला जातो, वाजपेयींचा वापरा जात होता. हे असं ठरवून होत नाही, लोकांच्या मनात तो नेता असतो, असे संजय राऊत म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here