अभिनेता सुशांत सिंह रजपूत आत्महत्ये प्रकरणी आदीत्य ठाकरे यांच्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष टीका होत असतानाच आता या प्रकरणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागणार आहे असे वक्तव्य भाजपा नेते निलेश राणे यांनी केले आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे. या प्रकरणामध्ये पाटणा पोलिसांकडे सुशांतच्या वडीलांनी दाखल केलेली तक्रार ही ग्राह्य धरून बिहार पोलिसांनी चौकशी न करता या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांना करु देण्यात यावी यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र या सुनावणीदम्यान महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयामध्ये झाल्याचा दावा भाजपाचे नेते निलेश राणे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे तुमच्या मुलाचं नाव सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्ड मध्ये आले… की आदित्य ठाकरेचा सुशांत सिंग राजपूतच्या केस मध्ये सहभाग जाणवतो. तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल कारण ह्या केस मध्ये तुम्ही आणि तुमच्या मुलाने पदाचा दुरुपयोग केला आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 11, 2020
काय म्हणाले निलेश राणे
“उद्धव ठाकरे तुमच्या मुलाचं नाव सुप्रीम कोर्टाच्या रेकॉर्ड मध्ये आले, की आदित्य ठाकरेचा सुशांत सिंग राजपूतच्या केस मध्ये सहभाग जाणवतो. तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लवकरच राजीनामा द्यावा लागेल कारण ह्या केस मध्ये तुम्ही आणि तुमच्या मुलाने पदाचा दुरुपयोग केला आहे,” असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.
या प्रकरणाशी आदित्यचा संबंध नाही
या प्रकरणाशी आदित्य ठाकरेंचा काहीही संबंध नसल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी एका वृत्तावाहिनीशी बोलताना स्पष्ट केले आहे. “आदित्य ठाकरेंचा या सर्व प्रकरणाशी काय संबंध? हिंमत असेल तर भाजपाच्या लोकांना जाहीरपणे त्यांचं नाव घ्यावं. ते चांगलं काम करत आहेत, मदत करत आहेत. बदनामी करण्याची मोहीम सुरु असून, हे चांगलं राजकारण नाही,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
Join Our WhatsApp Community