Nilesh Rane : निलेश राणे राजकारणात पुन्हा सक्रिय, २४ तासात असे काय घडले ?

सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, निलेश राणे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात झालेल्या बैठकीनंतर निलेश राणे यांची नाराजी दूर झाली आहे.

132
Nilesh Rane : निलेश राणे राजकारणात पुन्हा सक्रिय, २४ तासात असे काय घडले ?
Nilesh Rane : निलेश राणे राजकारणात पुन्हा सक्रिय, २४ तासात असे काय घडले ?

कोकणच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून जास्त काळ राजकारणात कार्यरत असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र व माजी खासदार नीलेश राणे यांनी स्थानिक राजकारणात कोंडी झाल्याने राजकीय निवृत्तीची घोषणा केली, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांची अखेर नाराजी दूर झाली आहे. निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा घेतलेला निर्णय मागे घेतला आहे. (Nilesh Rane )

सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, निलेश राणे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात झालेल्या बैठकीनंतर निलेश राणे यांची नाराजी दूर झाली आहे. तशी माहितीच रवींद्र चव्हाण यांनी मीडियाला दिली आहे. सिंधुदुर्गात निलेश राणे यांच्या नेतृत्वात पक्षाचा झंझावात कायम राहील, असं सांगतानाच निलेश राणे यांनी जो मुद्दा मांडला त्याची दखल घेण्यात आल्याचंही रवींद्र चव्हाण यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितलं. (Nilesh Rane )

(हेही वाचा : Sports Competition : मुरबाडच्या महाराष्ट्र मिलिटरी शाळेची रायफल शुटिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी)

निलेश राणे यांनी तडकाफडकी राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता. ट्विट करून त्यांनी ही माहिती दिली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न झाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही त्यांची समजूत घातली. पण निलेश राणे आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण या दोन्ही नेत्यांना सागरवर बोलावलं. या दोघांशीही चर्चा केली. तसेच निलेश राणे यांची समजूत काढून त्यांना पुन्हा पक्षात सक्रिय होण्यास सांगण्यात आलं. त्यामुळे निलेश राणे यांनीही आपला राजीनामा मागे घेत पक्षात सक्रिय होणार असल्याचं स्पष्ट केलं.

का घेतला असा निर्णय

ज्यावेळी छोटा कार्यकर्ता पक्षात काम करत असतो. त्यावेळी त्याच्या अडचणी सुद्धा वरिष्ठ नेत्यांनी जाणून घेतल्या पाहिजे, हे निलेश यांचं म्हणणं होतं. ते रास्त होतं. आम्ही आमदार आणि खासदारकीच्या निवडणुकांचाच विचार करत असतो. पण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत छोट्या कार्यकर्त्यांना लढायचं असतं. त्यांचा विचार आमच्याकडून पाहिजे तसा होत नाही. छोट्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घ्यायला हव्यात. त्या न जाणून घेतल्याने निलेश राणे नाराज होते. ते कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे नेते आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना नेते जाणून घेत नसल्याने त्यांनी टोकाचा निर्णय घेतला, असं चव्हाण म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.