वणवा पेट घेत आहे… हे वाक्य तुम्ही सिनेमात ऐकलं असेलच. मात्र आता त्याचा प्रत्यय राज्याच्या राजकारणात देखील पहायला मिळत आहे. राज्याच्या राजकारणात सध्या चर्चा आहे ती राणे आणि शिवसेना वादाची. शिवसेनेला आता राणे स्टाईल उत्तर देण्यासाठी राणे कुटुंब सज्ज झाले आहे. माजी खासदार निलेश राणे यांनी थेट संजय राऊत यांना इशारा दिला असून, संजय राऊत यांची क्लिप लवकरच जाहीर करतो, असे निलेश राणे म्हणाले.
(हेही वाचाः उद्धव ठाकरेंची विधाने असंविधानिक नाहीत का? राणेंचा सवाल… कोणती आहेत ‘ती’ विधाने?)
काय आहे ट्वीट?
संज्यामुळे त्रस्त झालेली पीडित महिला काही कारणांमुळे कोर्टात बाजू मांडू शकली नाही. पण आम्ही हायर कोर्टात जाणार आहोत. त्या महिलेला न्याय मिळेपर्यंत संज्या तुला सोडणार नाही. भाषेची वार्ता करतो, तर जी भाषा एका महिलेशी बोलताना संज्याने वापरली आहे ती ऑडियो क्लिप लवकरच जाहीर करतो, असे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे.
संज्यामुळे त्रस्त झालेली पीडित महिला काही कारणांमुळे कोर्टात बाजू मांडू शकली नाही पण आम्ही हायर कोर्टात जाणार आहोत. त्या महिलेला न्याय मिळेपर्यंत संज्या तुला सोडणार नाही. भाषेची वार्ता करतो, तर जी भाषा एका महिलेशी बोलताना संज्याने वापरली आहे ती ऑडियो क्लिप लवकरच जाहीर करतो.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 26, 2021
(हेही वाचाः आता भाजप फ्रंटफूटवर : रश्मी ठाकरेंच्या विरोधात तक्रार दाखल!)
काय होतं ‘ते’ प्रकरण?
संजय राऊत व विभक्त पतीच्या सांगण्यावरुन काही जण सातत्याने माझी छळवणूक करत आहेत. माझ्या मागे माणसे लावणे, माझ्यावर हेरगिरी करणे अशा मार्गांनी मला सतत दबावाखाली ठेवण्यात येत आहे. मागील सात वर्षांपासून माझी मानसिक छळवणूक सुरू आहे. पोलिसांत तक्रारी दिल्यानंतरही कारवाई होत नाही, असा आरोप करत महिलेने अॅड. आभा सिंग यांच्यामार्फत उच्च न्यायालयात तीन याचिका केल्या होत्या.
काय आहे राऊतांचे म्हणणे?
या सर्व प्रकरणावर संजय राऊत यांनी मार्चमध्ये प्रतिक्रिया दिली होती. याचिकादार महिलेसोबत माझे पूर्वीपासून कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत. तिला आणि तिच्या पतीला मी पूर्वीपासून ओळखतो. त्या दोघांमध्ये वाद सुरू आहेत आणि त्यात मी पतीची बाजू घेत असल्याचे तिला वाटते. म्हणून त्या गैरसमजातूनच तिने माझ्याविरोधात विनाकारण आरोप केले आहेत. ती महिला मला माझ्या मुलीसारखीच आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. दरम्यान न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
(हेही वाचाः भाजपचे आता मिशन ‘परब’)
Join Our WhatsApp Community