यंदाही मुंबईची तुंबई होणार का? पत्र लिहित राणेंनी विचारले मुख्यमंत्र्यांना प्रश्न

78

पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते, अशीच मुंबईची ओळख सातत्याने प्रसारमाध्यमे देतात. परंतु, या तुंबलेल्या मुंबईत अनेकांनी आपले हकनाक जीव गमावले, तरीही त्यावर ठोस उपाययोजना म्हणून मुंबई महापालिकेत दीर्घकाळ सत्ता भोगणारी शिवसेना मात्र काहीही करु शकलेली नाही. मुंबईला नुसती ठेकेदारंच्या फायद्यासाठी रंगरंगोटी आणि देखवा करुन गतवैभव प्राप्त होणार नाही. त्यासाठी जनेतेच्या मूळ समस्येकडे पण लक्ष दिले पाहिजे. यावर्षी चांगला पाऊस होण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. त्यामुळे पावसाळ्यात मुंबईची काय परिस्थिती असेल, याची कल्पना करवत नाही. यंदाही मुंबईची तुंबई होणार का? असा प्रश्न भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला आहे.

…तर 26 जुलैच्या परिस्थितीची आठवण होईल

तुंबणा-या या मुंबईत 386 अशी धोक्याची ठिकाणे आहेत. ज्याला आपण फ्लडिंग पाॅईंट्स म्हणतो. यापैकी 28 ठिकाणे एकाच पश्चिम विभागातील आहेत. फक्त माटुंगा, वडाळा, सायन भागातच यातील 25 फ्लडिंग पाॅंईंट्स आहेत. यंदाच्या पावसाळ्यात समुद्राला 22 दिवस भरतीही असणार आहे. त्यामुळे मुंबईत सलग 250 मिलीपेक्षा अधिक पाऊस पडला, तर मुंबईला 26 जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल का काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे.

पत्रातून मुख्यमंत्र्यांना सवाल

पावसाच्या पाण्याचा निचरा या फ्लडिंग पाॅईंट्स इथून झाला नाही तर मुंबईकरांना भीषण परिस्थितीला तोंड द्यावे लागेल. या फ्लडिंग पाॅईंट्स येथे पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप लावण्याच्या पलिकडे आपण काय उपाययोजना केल्या आहेत? हे आम्हा जनतेस कळाले पाहिजे.

( हेही वाचा :ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग मिळाल्याचा दावा; संबंधित जागा सील करण्याचे न्यायालयाचे आदेश )

जागितक स्तरावर मुंबईला बदनाम करणार आहात?

राज्य सरकार व पालिका प्रशासन या संवेदनशील मुद्द्यावर विविध विभागांचे मत लक्षात घेता, काही धोरण आखणार आहे का? तेथील नागरिकांना अशा संभाव्य आपत्तीजन्य परिस्थिती काय उपाययोजना करायच्या असतात, याविषयी आपण काही जनजागरण केले आहे का? या सर्व प्रश्नांची आपण समाधान साधणार आहात की नेहमीप्रमाणे मुंबईली तुंबई म्हणून देश व जागितक स्तरावर बदनाम करणार आहात, असा प्रश्न नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राच्या माध्यमातून विचारला आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.