‘लघुशंकेनी धरणाची उंची वाढवणा-यांची वैचारिक उंची कळाली’, नितेश राणेंचा अजित पवारांवर पलटवार

131

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर नितेश राणे यांनी ट्वीट करत अजित पवारांवर टीका केली होती. आपले सर्वस्व यांची श्रद्धा औरंगजेबावर आहे, हे केव्हाच सिद्ध झाले आहे, असे राणे म्हणाले. दरम्यान, याबाबत बोलताना टिल्ल्या लोकांनी सांगण्याची गरज नाही, असे प्रत्युत्तर अजित पवारांनी दिले होते. यावर आता पुन्हा एकदा नितेश राणे यांनी ट्वीट करत अजित पवारांवर खोचक शब्दात टीकास्त्र डागले आहे.

काय म्हणाले नितेश राणे?

लघुशंकेनी धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवाने दिलेल्या शरीरयष्टीवरुन भाष्य केले आहे. यावरुनच त्यांची वैचारिक ऊंची कळाली. तसेच, हे सिद्ध झाले की त्यांना औरंग्यावरची टीका सहन होत नाही. त्यामुळेच यांचे काका छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपुढे कधीही नतमस्तक झाले नाहीत, अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी ट्वीट करत दिली आहे.

( हेही वाचा: राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाच्या लग्नात विषबाधा; 700 जणांची प्रकृती बिघडली )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.