एमआयएमचे तेलंगणातील आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी गुरुवारी औरंगाबादचा दौरा केला. त्यावेळी त्यांच्यासोबत औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील आणि वारिस पठाण हे उपस्थित होते. एका महिला शाळेच्या उद्धाटनासाठी आले असताना, खुल्ताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचे त्यांनी दर्शन घेतले. त्यांच्या या दर्शनानंतर वादाला तोंड फुटले आहे. भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करत, यावरुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
नितेश राणेंचा ओवैसीला इशारा
गुरुवारी औरंगाबाद दौ-यावर असताना, आपल्या जाहीर सभेत ओवैसी यांनी राज ठाकरे आणि महाराष्ट्रातील सरकारवर टीका केली होती. त्याअगोदर त्यांनी औरंगजेबाच्या करबीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करत, ओवैसीला इशारा दिला आहे. “मी आव्हान करतो, पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा.. याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर… आम्ही शिवरायांचे मावळे नाही..” असे ट्वीट करत राणेंनी इशारा दिला.
मी आव्हान करतो, पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा..
याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर..
आम्ही शिवरायांचे मावळे नाही!!!— nitesh rane (@NiteshNRane) May 13, 2022
( हेही वाचा: स्वच्छतागृहांमध्ये आता महिला सुरक्षारक्षक; न्यायालयाची शिफारस )
महाराष्ट्रात नामर्दांचे सरकार
नितेश राणेंनी दुसरे ट्वीट करत म्हटले की, या कारट्या ओवैसीला माहिती आहे का की, मी औरंगजेबाच्या थडग्या समोर नागडा नाचलो, तरी मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल… कारण राज्यामध्ये नामर्दांचे सरकार आहे….असे म्हणत त्यांनी सरकारवरही टीकास्त्र सोडले आहे.
Join Our WhatsApp Communityया कारट्या ओवेसी ला माहीत आहे की,
मी औरंगजेबाच्या थडग्या समोर नागडा नाचलो तरी मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल.. कारण राज्या मध्ये "नामर्दांचे सरकार आहे"…याला म्हणतात यांचे खरे हिंदुत्व!! pic.twitter.com/FB7pVSOraE
— nitesh rane (@NiteshNRane) May 13, 2022