हिंदूंनी तिसरा डोळा उघडला तर, अवघड होईल…नितेश राणे काय म्हणाले?

123

‘लव्ह जिहाद, धर्मांतराची सक्ती, हिंदूंच्या सणांच्यावेळी गोंधळ ते थेट रामनवमीच्या मिरवणुकीच्यावेळी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यापर्यंत मजल गेली आहे. तरीही पोलिस आणि प्रशासन निष्क्रिय आहे, असेच सुरु राहिले तर हिंदू तिसरा डोळा उघडतील, तेव्हा मात्र अवघड होईल, असा इशारा भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांनी दिला.

वातावरण सुधारण्याची जबाबदारी प्रशासनाची

अहमदनगर जिल्ह्यातील सक्तीच्या धर्मांतराच्या घटना, लव्ह जिहादच्या घटना आणि रामनवमीच्या मिरवणुकीत काही ठिकाणी घडलेले अनुचित प्रकार यासंबंधी राणे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेतली. त्यांच्यासमवेत माजी खासदार अमर साबळे, अहमदनगरचे भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष भय्या गंधे उपस्थित होते. या भेटीनंतर राणे यांनी पत्रकारांशी चर्चा केली. पीडित हिंदू वारंवार तक्रारी करत आहेत, परंतु जर कारवाई होत नसेल आणि पोलिस काही करत नसतील, तर आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत. खरे तर वातावरण सुधारण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. अन्यथा हिंदू समाजाने तिसरा डोळा उघडला तर परिस्थिती कठीण होऊन जाईल. या सर्व गोष्टी सरकारच्या आशिर्वादानेच सुरू आहेत. प्रशासन सरकारच्याच इशाऱ्यावर चालते. त्यामुळे थेट नावानिशी वारंवार तक्रारी करूनही सक्तीने धर्मांतर करणाऱ्या राहुरीतील कमलसिंगवर कारवाई होत नाही. त्याला मांडीवर बसवून फिरवत आहेत म्हणजे तो त्यांचा जावई असेल.’

(हेही वाचा आधी सभा साहेबांची, मग लग्न घरातले! वसंत मोरे ठाण्यात पोहचले)

कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी हिंदूंचीच का?  

आता आम्ही पोलिसांना सांगणार आहोत की तुम्हाला जमत नसेल, तर त्या तुमच्या पाहुण्याला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याची कशी व कोठे मिरवणूक काढायची ते पाहू. रामनवमी मिरवणुकीच्या वेळी ज्या घोषणा दिल्या गेल्या, जे झेंडे दाखविले गेले, ते आपल्या महाराष्ट्रासाठी पोषक आहे का? या गोष्टी घडत असताना पोलिस फक्त बघ्याची भूमिका घेत असतील तर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी फक्त हिंदू धर्मावरच आहे का? याचे उत्तर पोलिसांनी द्यावे, असेही राणे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.