सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाविषयीच्या विधानावरून राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे. तसेच या विधानावरून सत्ताधारी शरद पवारांवर टीकास्त्र सोडत आहे. आता भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शरद पवारांनी जहरी टीका करत शरद पवारांची तुलना औरंगजेबासोबत केली आहे.
शरद पवारांनी केलेल्या विधानाविषयी निलेश राणे यांनी ट्वीट करत एका वृत्तवाहिनीच्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ट्वीटमध्ये निलेश राणे यांनी लिहिले आहे की, ‘निवडणूक जवळ आली की पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होतात. कधी कधी वाटतं औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार.’ आता निलेश राणेंच्या या ट्वीटवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणूक जवळ आली की पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होतात,
कधी कधी वाटतं औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार. pic.twitter.com/1Rot33Ldct
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 7, 2023
(हेही वाचा – कोल्हापूर हिंसाचार प्रकरणी ६ जणांना अटक)
शरद पवार काय म्हणाले होते?
देशातील मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाविषयी चिंता वाटावी, अशी परिस्थिती सध्या आहे. ख्रिश्चन समाजाचे प्रार्थनास्थळ असलेल्या चर्चवर हल्ले होत आहेत. मुस्लिम समाजात चार-दोन लोकांकडून चुका होऊ शकतात, तशाच हिंदूंकडूनही चुका होतात. मुस्लिमांच्या विषयी लोकांच्या मनात जाणूनबुजून कटुता पेरली जात आहे. हे देशासमोरील एक मोठे आव्हान आहे, असे मला दिसत आहे, असे शरद पवार म्हणाले होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community