“A फॉर आफताब, A फॉर आदित्य ठाकरे, सगळ्या विकृतींचं नाव एकच!”, नितेश राणेंचा हल्लाबोल

154

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनंतर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी बुधवारी लोकसभेत दिशा सालियान मृत्यू प्रकरणी गंभीर आरोप केल्यानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दरम्यान, शेवाळेंच्या आरोपानंतर नितेश राणेही आदित्य ठाकरेंविरोधात आक्रमक झाले आहेत. तसेच याप्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी भाजपचे नेते नितेश राणे यांनी केली. इतकेच नाही तर नितेश राणे यांनी सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करत चांगलाच हल्लाबोल चढवला आहे.

नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

A फॉर आफताब पुनावाला, A फॉर आदित्य ठाकरे, सगळ्या विकृतींचं नाव एकच समान!”, असे म्हणत नितेश राणे यांनी म्हणत आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. तर श्रद्धा वालकर प्रकरणात जसे आफताब पुनावालाची नार्कोटेस्ट झाली आणि सत्य समोर आले, तसेच आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील सत्य बाहेर येईल, अशी मागणीही नितेश राणे यांनी केली आहे. सगळ्यांनी विचार करायला हवा महाराष्ट्रात एवढे राजकारणी आहे. जेव्हा सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियानचा विषय येतो तेव्हा आदित्य ठाकरेंचाच उल्लेख का होतो. इतरांचा का होत नाही. म्हणजेच दाल में कुछ काला है… असे म्हणत आदित्य ठाकरेंवर नितेश राणेंनी संशय व्यक्त केला आहे.

(हेही वाचा – आदित्य ठाकरे अडचणीत? सुशांतसिंह प्रकरणाच्या चौकशीबाबत मुख्यमंत्र्यांचे संकेत; म्हणाले…)

पुढे ते असेही म्हणाले, आतापर्यंत मी, राणे साहेब, अमित साटम, अतुल भातखळकर आम्ही सगळेजण बोलत होतो. सुशांत सिंह राजपूतचे फॅन्सही यांच्या चौकशीची मागणी करत आहेत. बुधवारी ज्यांनी हा विषय लोकसभेत उपस्थित केला ते राहुल शेवाळे मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमध्ये होते. यांच्या विश्वासातील होते. वर्षानुवर्षे स्थायी समितीचे अध्यक्ष होते. काल आदित्य ठाकरे म्हणाले की, मी त्यांना काडीचीही किंमत देत नाही. पण हेच शेवाळे स्थायी समितीचे अध्यक्ष अशताना खासदार असताना ते तुमच्या घराकडे पेट्या पोहोचवायचे तेव्हा त्यांना किती किंमत होती, तेही तुम्ही सांगा, असे म्हणत नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.