“…हे बघून हसावं की रडावं”, निलेश राणेंचा ‘मविआ’वर हल्लाबोल

160

दाऊदशी संबंधित व्यक्तीसोबत व्यवहार केल्याप्रकरणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांना ईडीने अटक केली आहे. मलिक न्यायालयीन कोठडीत असतना ते मंत्री असलेल्या अल्पसंख्याक विभागाचे निर्णय घेत आहेत, असा हल्लाबोल भाजप नेते निलेश राणे यांनी केला आहे. काय शोकांतिका आहे. हे बघून हसावं की रडावं कळत नाही, असे निलेश राणे म्हणाले. महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. अशातच भाजपच नेते मंडळी महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसतेय. नवाब मलिकांनी तुरुंगात असताना त्यांचा मंत्रिमंडळ निर्णय जाहीर केल्याने निलेश राणे यांनी टीका केली आहे.

निलेश राणेंचा ठाकरे सरकारवर निशाणा

गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीमध्ये अल्पसंख्यांक विभागातही निर्णय़ घेण्यात आले आहेत. याची माहिती सरकारकडून ट्विटर हँडलवर देण्यात आली आहे, यावरून महाविकास आघाडी सरकारवर भाजप नेते निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे. दरम्यान, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या विभागाचा निर्णय सादर केला असून त्यात नवाब मलिकांचा देखील फोटो आहे. या निर्णयाच्या फोटोवरुन निलेश राणेंनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

असे केले निलेश राणेंनी ट्विट

(हेही वाचा – Money Laundering Case : अनिल देशमुखांचा कोठडीतील मुक्काम वाढला)

मंत्रिमंडळ निर्णयाचा फोटो ट्विटरवर शेअर महाविकास आघाडीवर टीका केली आहे. गुरूवारी मलिकांनी एक मंत्रिमंडळ निर्णय जाहीर केला होता. येरवडा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी पदनिर्मिती करण्यास मान्यता दिल्याचा मंत्रिमंडळ निर्णय आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा फोटो आहे. या फोटोसह निलेश राणेंनी काय शोकांतिका आहे… हे बघून हसावं की रडावं कळत नाही. दाऊदच्या हस्तकासोबत व्यवहार केल्या प्रकरणात नवाब मलिक जेलमध्ये आहेत. तरीही मंत्री आहे आणि जेलमध्ये बसून मंत्री मंडळाच्या निर्णयावर महाराष्ट्र शासनाने मंत्री नवाब मलिक यांनी निर्णय जाहीर केलाय, असे ट्विट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.