अंधारेंच्या गरळ ओकण्याला उद्धव ठाकरेंची मूक सहमती; भाजपचा घणाघात

150

मागच्या काही दिवसांपासून सुषमा अंधारेंनी हिंदू देवीदेवता आणि महान संतांबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात राज्यातील सरकार आक्रमक झाले आहे. तर वारकरी संप्रदायानेदेखील अनेक ठिकाणी आंदोलने करुन निषेध नोंदवला आहे. अशातच आता भाजपचे नेते नितेश राणे यांनी अंधारेंनी केलेल्या वक्तव्यांविरोधात उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदू देवीदेवतांविरोधात गरळ ओकल्याचे पुरावे असूनही, त्याच्या या वक्तव्यांविरोधात उद्धव ठाकरेंनी कोणतीच कारवाई केली नसल्याने, त्याचाच अर्थ असा की, त्यांच्या वक्तव्याला ठाकरेंची मूक सहमती आहे, असा घणाघात नितेश राणे यांनी केला आहे.

( हेही वाचा: मविआच्या महामोर्चाला अशोक चव्हाणांची दांडी; काँग्रेसमध्ये वेगळीच चर्चा )

नितेश राणेंचे ट्वीट

ज्याअर्थी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अंधारे बाईंचा विरोध होऊनही… हिंदू देवीदेवता आणि महान संतांबद्दल अंधारेंनी गरळ ओकण्याचे पुरावे समोर आल्यानंतरही… उद्धव ठाकरे त्यांचे साधे निलंबन किंवा राजीनामा द्यायला सांगत नाहीत, याचा हाच अर्थ .. ठाकरेंची मूक सहमती आहे, असे ट्वीट नितेश राणे यांनी केले आहे.

आशिष शेलारांचा सवाल

सुषमा अंधारे यांनी हिंदू धर्माबाबत वक्तव्ये करण्याची हिंमत केली, ती अन्य धर्माच्याबाबतीत केली असती का? याला  उद्धव ठाकरेंची मूक संमती आहे का, असा सवाल भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला. भगवान रामचंद्र, शंकराबद्दल त्यांनी वापरलेली वाक्य गंभीर आहेत. तुम्ही बोलत असाल तर तुमच्या पक्षाच्या प्रमुखांनी उत्तर द्यावे, ते गप्प का आहेत, असा प्रश्नही शेलार यांनी उपस्थित केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.