धर्मांतर बंदी कायदा महाराष्ट्रात लागू करायची वेळी आलीय; नितेश राणेंचे सूचक ट्वीट

123

महाराष्ट्रात आता भगवाधा-यांची सत्ता आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि इतर अनेक राज्यांप्रमाणे धर्मांतर विरोधी कायदा आणण्याची वेळ आता महाराष्ट्रातही आली आहे. निष्पाप महिलांना अडकवले जाते आणि छळले जात आहे. त्यांना संरक्षण देण्याची गरज आहे. चला याची लवकरच सुरुवात करुया, जय श्री राम, असे ट्वीट नितेश राणे यांनी केले आहे.

( हेही वाचा: प्रवाशांसाठी खुशखबर! ‘या’ दोन विशेष ट्रेनच्या कालावधीत वाढ )

कर्नाटक सरकारच्या विधेयकातील तरतूद

कर्नाटक सरकारच्या या विधयेकात सक्तीचे धर्मांतर केल्यास, तीन ते चार वर्षाच्या तुरुंगवासासह 25 हजार रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. अल्पवयीन, महिला किंवा एससी/ एसटी व्यक्तीचे धर्मांतर केल्यास तीन ते 10 वर्षाचा तुरुंगवास आणि 50 हजार रुपये दंड होऊ शकतो, असं या विधेयकात नमूद करण्यात आले आहे. इतकेच नाही तर सामूहिक धर्मांतरासाठी तीन ते 10 वर्षाचा तुरुंगवास आणि एक लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.