पवार-फडणवीस भेटीमागे दडलंय काय?

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतल्याने महाविकास आघाडीत सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि शिवसेनेच्या पोटात नक्कीच गोळा आला असावा.

शरद पवार… राज्याच्या राजकारणातील असे नाव ज्यांच्या भूमिकेने अनेकांना बुचकळ्यात टाकले आहे. मग ते 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला पाठिंबा देणारे विधान असो वा आता त्यांनी राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीचा केलेला प्रयोग असो…पवारांच्या याच नव्या प्रयोगाने भाजपला सर्वाधिक जागा जिंकूनही विरोधी बाकावर बसावे लागले…मात्र आता देवेंद्र फडणवीस यांनी पवारांची भेट घेतल्याने पुन्हा राजकीय वातावरणात जोरदार चर्चा सुरू आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतल्याने महाविकास आघाडीत सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि शिवसेनेच्या पोटात नक्कीच गोळा आला असावा.

(हेही वाचा : कोरोनात जनता घरात, राजकारणी मात्र मोकाट! आमदार लांडगेंचा धिंगाणा! 

भेटीचे कारण गुलदस्त्यात

देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांची भेट का घेतली हे जरी अद्याप कळू शकते नसले तरी राज्यात पेटलेल्या आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच शरद पवार यांच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया पार पडली. ते एप्रिल महिन्यापासून सिल्व्हर ओकवर विश्रांती घेत आहेत. याचमुळे त्यांच्या तब्येतीची विचारपूस देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ओबीसींच्या अतिरिक्त आरक्षणावर स्थगिती दिली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या पाठोपाठ ओबीसी आरक्षणही अडचणीत सापडले आहे. आता राज्यात दोन्ही घटकांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यावर राज्य सरकारने केंद्रावरच जबाबदारी ढकलली आहे. त्यामुळे या विरोधात आता राज्य सरकारचे काय अधिकार आहेत आणि राज्य सरकराने त्यासाठी काय करणे अपेक्षित आहे, याची सविस्तर माहिती फडणवीस यांनी शरद पवार यांना दिली असावी, अशी माहिती समजते. कारण फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून याआधी त्यांना ओबीसी आरक्षणाबाबत कसे सजग केले होते, याबाबत सविस्तर माहिती दिली होती. त्यामुळे सरकार विरोधी पक्षाच्या मतांना केराची टोपली दाखवते आणि दुसरीकडे तोंडघशी पडल्यावर केंद्रावर दोषारोप करते, यामुळे समाजाचे नुकसान होत असल्याची फडणवीसांची भावना आहे. ती त्यांनी पवारांपर्यंत पोहचवली असण्याचाही शक्यता आहे. 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here