‘माझे भाषण पूर्ण ऐका…’, मोदींबाबत केलेल्या ‘त्या’ विधानाचा पंकजा मुंडेंनी केला खुलासा

88

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर भाजप पुन्हा एकदा सत्तेत आला आहे. पण नवीन सरकारमध्ये देखील भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना स्थान देण्यात न आल्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चा होत आहेत. अशातच मुंडे यांनी मंगळवारी एका जाहीर कार्यक्रमात पंतप्रधान मोदी देखील मला संपवू शकत नाहीत, असे विधान केले आणि त्यांची नाराजी उघड झाल्याचे बालले जाऊ लागले. पण पंकजा मुंडे यांनी याबाबत खुलासा केला आहे. माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला असून माझे संपूर्ण भाषण ऐकावे, असे ट्वीट करत पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

पंकजा मुंडे यांचे ट्वीट

पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणाची लिंक ट्विटरवर शेअर करत हा खुलासा केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबरपासून विविध कार्यक्रम केले,त्यात बुद्धिजीवी संमेलन मधील माझ्या भाषणाच्या हायलाईट्स. आपल्यापर्यंत एक ओळ आलीच आहे. “सनसनीखेज” बातम्यांतून जमले तर हेही पहा,मतितार्थ लक्षात येईल.पूर्ण भाषण ऐकावे, असे ट्वीट करत पंकजा मुंडे यांनी केले आहे.

काय म्हणाल्या होत्या मुंडे?

ज्या मुलांची आर्थिक परिस्थिती बिकट होती त्यांनी आपल्या आयुष्यात फार मोठे कार्य केले आहे. असाच एक मुलगा आपल्या देशाला पंतप्रधान मोदींच्या रुपाने लाभला. त्या मुलाकडे शाळेत जायला आणि शाळेचा गणवेश घ्यायला पैसे नव्हते. ज्याचे वडील रेल्वे स्टेशनवर चहा विकत होते आणि आई चुलीसमोर स्वयंपाक करत होती. आज तोच मुलगा देशाचा पंतप्रधान बनला. महत्त्वाकांक्षा हा शब्द मला आवडत नाही, पण मोठी स्वप्न बघायला हरकत नाही.

(हेही वाचाः ‘अक्कल नसलेल्या मूर्खांना मी उत्तर देत नाही’, फडणवीसांचे काँग्रेसला प्रत्युत्तर)

पंतप्रधान मोदी यांना एक मिनिट देखील आराम करत नाहीत. भारताला जागतिक महासत्ता बनवण्याचं स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं आहे. ते आयुष्यात पहिल्यांदा आमदार झाले आणि थेट राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर पहिल्यांदा खासदार झाले आणि थेट देशाचे पंतप्रधान झाले. त्यानंतर दुस-यांदा ऐतिहासिक बहुमताने निवडून आले. यासाठी नियोजन, सातत्य आणि सकातरात्मकता असणं गरजेचं असतं, असं पंकजा मुंडे यांनी या भाषणात म्हटले होते.

मोदींना वंशवाद संपवायचंय

नरेंद्र मोदी यांचे विश्वात एक वलय निर्माण झाले आहे. त्यामुळे आपण त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. मोदींना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. मी सुद्धा वंशवादातून राजकारणात आले आहे. पण मोदींनी देखील मला संपवायचं ठरवलं तरी ते मला संपवू शकत नाहीत जर मी तुमच्या मनात असेन. त्यामुळे राजकारणात आपल्याला बदल करणे गरजेचे असल्याचेही पंकजा मुंडे यांनी या भाषणात म्हटले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.