‘सध्या मी बेरोजगार आहे त्यामुळे…’, पंकजा मुंडेंच्या नव्या विधानाची चर्चा

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे या आपल्या निरनिराळ्या वक्तव्यांमुळे चांगल्याच चर्चेत आहेत. एकीकडे त्या भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा होत असतानाच बीड जिल्ह्यातील परळी येथे झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी केलेल्या मिश्कील विधानामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. सध्या मी बेरोजगार आहे त्यामुळे मला तुमची प्रार्थना ऐकून आनंद झाला, असे विधान पंकजा मुंडे यांनी केले आहे.

…म्हणजे मलाही काम मिळेल

परळी येथे संत भगवान बाबा प्रतिष्ठानतर्फे नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी पंकजा मुंडे यांनी हे विधान केलं आहे. फुलचंद काकांनी देवीच्या कानात सांगितलं की पंकजाताईंना सांग मला काहीतरी काम द्यायला. पण मला त्यांच्या या सांगण्यामुळे खूप आनंद झाला. कारण मी जर कोणाला काम देऊ शकते म्हणजे मलाही काम मिळेल. सध्या मी बेरोजगारच आहे. त्यामुळे मला त्यांची प्रार्थना आवडली. म्हणजेच एक तीरमे दोन शिकार, अशी मिश्कील टिप्पणी पंकजा मुंडे यांनी केली आणि एकच हशा पिकला.

(हेही वाचाः ‘काही माणसं ढळली, पण खरे ‘अढळ’ माझ्यासोबत’, उद्धव ठाकरेंचा शिवाजीराव अढळरावांना टोला)

सध्याची युद्ध सोशल मीडियावर होतात

जुन्या काळातील युद्ध आणि आताच्या युद्धांमध्ये फरक आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या वेळी कार्यकर्ते,नेते आणि परिस्थिती सगळंच वेगळं होतं. पण आताची युद्ध ही सोशल मीडियावर लढली जातात. त्यासाठी कोणत्याही शस्त्रांची गरज नाही. मी तुझ्याबाबत अफवा पसरवतो, तू माझ्याबोबत अफवा पसरवं, असे युद्ध सुरू असल्याचेही पंकजा चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here