‘दोन वर्षांत मनात साचलेलं तुम्हाला सांगायचं आहे’… दसरा मेळाव्यात पंकजाताई काय बोलणार?

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना येत्या दसरा मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. हे आवाहन करताना त्यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये मनात साचलेल्या सर्व गोष्टी आपल्याला सांगयच्या आहेत, खूप काही बोलायचे आहे, असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता पंकजाताई नेमकं काय बोलणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. आपल्या फेसबूक पेजवरुन व्हिडिओ शेअर करत त्यांनी हे आवाहन केले आहे.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

या दोन वर्षांत अनेक घटना घडल्या, अनेक उतार-चढाव पाहिले, अनेक संघर्ष, अनेक यश-अपयश यांची सर्व कहाणी हे मला आपल्याला सांगायचे आहे. त्यातून आपण प्रेरणा घेऊन आपली भविष्यातील वाटचाल कशी करायची याबद्दल मला तुमच्याशी चर्चा करायची आहे, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

(हेही वाचाः फडणवीसांचा मराठवाडा दौरा, पंकजाताई म्हणाल्या ‘मला बोलायचं नाही’… का? वाचा)

काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष 

मी काय बोलणार हे याकडे तुमच्यासह माझंही लक्ष आहे. कारण मी जे बोलते ते स्वयंप्ररणेने आणि भगवान बाबांच्या आशीर्वादाने आणि मुंडे साहेबांच्या संस्कारांवर आधारित बोलते. आपण खूप सारे संकल्प आपण केले ते आपण पार पाडले. हे संकल्प करण्यासाठी दरवर्षी आपण भगवान भक्तीगडावर जमतो. त्यामुळे येत्या 15 ऑक्टोबर रोजी सावरगाव येथील भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्यासाठी कोरोनाचे सर्व नियम पाळून आपण नक्की उपस्थित रहा, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे.

पंकजा मुंडे नाराज?

गेल्या काही काळापासून पंकजा मुंडे या भाजपामध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रीपद न दिल्यामुळे अनेक मुंडे समर्थकांनी आपले राजीनामे दिल्याचेही समोर आले होते. त्यामुळे आता याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे या दसरा मेळाव्यात काय बोलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here