NIA कारवाईतून बड्या नेत्यांची नावे समोर येणार; प्रसाद लाड यांच्या दाव्याने खळबळ

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मुंबईत सोमवारी 29 ठिकाणी एनआयएकडून छापेमारी करण्यात आली. या माहीम दर्ग्याचे विश्वस्त सोहेल खंडवानी यांना ताब्यात घेतले. त्यानंतर खंडवानी आणि मंत्री नवाब मलिक यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. दरम्यान, दाऊद इब्राहीम याच्याशी सलगी करून व्यवहार केलेल्यांच्या यादीत महाविकास आघाडीतील कित्येक नेत्यांचे संबंध असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यासंदर्भात भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनी बड्या नेत्यांची नावे समोर येणार, असा दावा केला. या दाव्याने एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या अडचणी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

एनआयएचे जे दाऊदशी संबंधीत लोकांकडे छापे पडत आहेत, यातून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचेही नाव समोर आले आहे. अशाच प्रकारे आणखी बड्या नेत्यांनी नावे समोर येण्याची शक्यता आहे. त्याविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे. 

– प्रसाद लाड, भाजप नेते

प्रसाद लाड यांनी दिले संकेत

एनआयएच्या कारवाईतून मुंबईत भविष्यात होणारे घातपात आणि पूर्वी झालेले घातपात यातील बड्या नेत्यांचा सहभाग लवकरच समोर येणार असल्याचे विधान प्रसाद लाड यांनी केले आहे. त्यामुळे प्रसाद लाड यांनी एनआयएकडून लवकरच आघाडीतील नेत्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिल्याचे मानले जात आहे.

एनआयएने केला मोठा दावा

दाऊद इब्राहीमच्या व्यवहारांचे काही नेत्यांशी संबंध असल्याचे पुरावे केंद्रीय तपास यंत्रणांच्या हाती लागले असल्याची माहिती उघड होत आहे. भाजपमधून आलेल्या दोघांसह राष्ट्रवादीचे सहा, काँग्रेसमधील चार आणि शिवसेनेचे दोघेजण या व्यवहारांत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामध्ये ठाकरे सरकारमधील काही मंत्री असल्याचे सांगितले जात आहे. दाऊद इब्राहीमकडून रियल इस्टेट तसेच अन्य माध्यमातून जमा झालेले पैसे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना लष्कर ए तयबा, जैश ए मोहम्मद आणि अल कायदा या दहशतवादी संघटनांना पुरवल्या जात आहे, असा दावा एनआयएने केला आहे.

मुंबईतील या 20 अड्ड्यांवर छापेमारी

मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएने बोरिवली, सांताक्रूझ, वांद्रे, नागपाडा, गोरेगाव, परळ येथील 20 ठिकाणी छापे टाकले आहेत. गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, एनआयएने दाऊद इब्राहिम, डी कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला होता, ज्यासंदर्भात ही चौकशी आणि छापेमारी सुरू आहे. दाऊद इब्राहिमशी संबंधित प्रकरणाचा तपास गृह मंत्रालयाने फेब्रुवारी 2022 मध्ये एनआयएकडे सोपवला होता. राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ही देशातील सर्वात मोठी दहशतवादी तपास संस्था आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here