कर्नाटकात हिजाबच्या विषयानंतर ‘हलाल’ चा वाद वाढला, आता महाराष्ट्रात अजानचा मुद्दा चर्चेला आला आहे. सर्वात आधी भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी मुंबईतील मशिदींवर लावण्यात आलेले अनधिकृत भोंगे काढण्यात यावे, अशी मागणी केली होती, आता भाजप नेते प्रसाद लाड यांनी मुंबईसह महाराष्ट्रात दिवसातील पाच वेळा लाऊडस्पीकरवरून होणारे अजान बंद करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात अजानचा वाद वाढणार आहे.
आमचा धर्माला विरोध नाही
भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी यासंबंधी म्हणाले की, जुन्या काळामध्ये वेळ समजण्यासाठी अजानचा वापर केला जायचा. पण आज सगळ्यांकडे घड्याळे, मोबाईल आहेत. त्यामुळे आता अजानची गरज नाही, तसेच आम्ही हे अजान बंद करुन राहणारच असे सांगताना केवळ हिंदू सणांना का विरोध केला जातो, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. दिवसातून पाच वेळा अजानचा भोंगा वाजतो. त्याला भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचा विरोध आहे. आम्ही मुंबईतील, महाराष्ट्रातील कार्यकर्ते म्हणून हे सांगू इच्छितो, आम्ही धर्माला विरोध करत नाही, पण धर्माच्या माध्यमातून ज्या पद्धतीने धर्म बळकावण्याचे काम करत आहात त्याला आमचा विरोध आहे.
(हेही वाचा पगार वाढणार! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना गुढीपाडव्याची भेट)
हिंदूंच्या सणांना विरोध, मग अजानला का नाही?
महाराष्ट्रात दिवाळीला विरोध, गणपतीला विरोध, होळीला विरोध, गुढीपाडव्याच्या मिरवणुकीला विरोध, रामनवमीला विरोध मग अजानला विरोध का नाही? त्यामुळे या मुंबईतील, महाराष्ट्रातील अजान बंद झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे आणि हे आम्ही बंद करुन राहणार, असे प्रसाद लाड यांनी सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community