शनिवारी हनुमान चालिसाच्या पठणावरुन झालेल्या वादानंतर, राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली. या अटकेनंतर त्यांना भेटायला गेलेल्या किरीट सोमय्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर, आता भाजपमधून तीव्र प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, राज्यात एका सेंकदात राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे, अशी परिस्थिती असल्याचे दरेकरांनी यावेळी म्हटले.
मुख्यमंत्री गप्प का?
प्रवीण दरेकर पुढे म्हणाले की, आत नाकातोंडात पाणी जात आहे. सत्ता येत असते, जात असते. पण सत्तेचा उन्माद आणि सत्तेचा वापर करुन राज्यात अशी गुंडागर्दी कधीच झाली नसल्याचे प्रविण दरेकर यावेळी म्हणाले. हे वेळीच थांबले नाहीतर एका बाजूने हल्ला केला तर दुस-या बाजूने देखील प्रतिहल्ला होईल. त्यामुळे हे थांबले पाहिजे, असे दरेकर म्हणाले. मुख्यमंत्रई याबाबत का हस्तक्षेप करत नाहीत, असे दरेकर यावेळी म्हणाले. राजकीय कामांसाठी पोलिसांचा वापर केला जात असल्याचे, दरेकर यावेळी म्हणाले.
( हेही वाचा: दगडफेक झाली हे खरं आहे… सोमय्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर गृहमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया )
सोमय्या हे राणा दाम्पत्यांची भेट घेऊन खार पोलीस स्थानकातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या गाडीवर संतप्त शिवसैनिकांनी जोरदार हल्ला चढवला. त्यांच्या गाडीवर दगड, बाटल्या, चप्पला फेकण्यात आल्या. या हल्ल्यात सोमय्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या व त्यांच्या चेह-याला दुखापत झाली. सोमय्या यांच्या हनुवटीला मार लागला, असून त्यातून रक्तस्त्राव होत होता. दरम्यान यानंतर सोमय्या यांनी वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.