उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्मावर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. उदयनिधी यांच्यानंतर डीएमकेचे नेते ए राजा, मल्लिकार्जुन खर्गे यांचे सुपूत्र प्रियांक खर्गे यांनीही सनातन धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. या मुद्द्यावरुन भाजप काँग्रेस आणि I.N.D.I.A. आघाडीवर निशाणा साधत आहे. त्याचवेळी अयोध्येतील श्रीराम मंदिरावरून (Shri Ram Mandir) उद्धव ठाकरे यांनी वादग्रस्त विधान केले, त्यावर भाजपचे नेते रविशंकर प्रसाद यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
यावेळी रविशंकर प्रसाद यांनी उद्धव ठाकरेंवरही जोरदार प्रहार केला. राम मंदिराच्या (Shri Ram Mandir) उद्घाटनावेळी गोध्रासारखी घटना घडेल, या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर रविशंकर प्रसाद म्हणाले की, उद्धव ठाकरेंची कमाल वाटते. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी राम मंदिराच्या आंदोलनाला नव्या उंचीवर नेले, त्यांचा मुलगा असे वक्तव्य करतो, ही खूप शरमेची बाब आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. लालू यादव-अखिलेश गप्प का? लालू प्रसाद यादव मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यानंतर त्यांनी वैद्यनाथ धामचेही दर्शन घेतले. पण, सनातनच्या अपमानावर एक चकारही काढला नाही. अखिलेश यादवही गप्प आहेत. मी पुन्हा विचारेन, सोनिया गांधी, तुम्ही गप्प का आहात? तुमचा सनातनच्या विरोधाला पाठिंबा आहे का? काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आपल्या मुलाच्या वक्तव्यावर काहीच बोलले नाहीत, असेही रविशंकर म्हणाले.
(हेही वाचा NDA : लोकसभा निवडणुकीत एनडीएमध्ये मोठा पक्ष सहभागी होणार; कर्नाटकात बदलणार गणित)
Join Our WhatsApp Community