संभाजी राजेंना सत्तेसाठी खुर्चीवर प्रेम करता आले असते, पण नाही…मुनगंटीवार यांचा सेनेवर हल्ला

144

धर्मवीर संभाजी राजे यांच्यावर ४० दिवस अत्याचार करण्यात आले, त्यांची चामडी सोलून काढली, नखे काढली, केस काढले, डोळ्यांत गरम सळई घुसवली, पण त्यांनी स्पष्टपणे सांगितले कितीही अत्याचार केला, तरी मी धर्मांतरण करणार नाही. त्यांनाही सत्तेसाठी खुर्चीवर प्रेम करता आले असते, पण नाही कारण ते धर्मवीर होते, अशा शब्दांत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला अप्रत्यक्षपणे विधानसभेत टोला हाणला. धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने मुनगंटीवार यांनी औरंगाबादचे नामकरण संभाजी नगर करण्यात यावे, ही मागणी केली, त्यावेळी त्यांनी शिवसेनेला कोंडीत पकडले.

तर आयुष्यात निवडणूक लढणार नाही

1988 मध्ये सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर औरंगाबादचे नाव बदलून, संभाजी नगर करण्याचा प्रस्ताव आखण्यात आला होता. हिंदूहद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे 27 उमेदवार निवडून आल्यानंतर, विजयोत्सव करण्यात आला. त्यावेळी त्यांनी म्हणजे बाळासाहेबांची जी जुनी शिवसेना होती आणि भाजप यांनी मिळून ही घोषणा केली होती. यात काही प्रक्रिया असतात, त्या 4 मार्च 2020 ला पूर्ण झालेल्या आहेत आणि या प्रक्रियेनुसार, सहाय्यक आयुक्त महसूल डाॅक्टर एस.पी. सावरगावकर यांनी हा प्रस्ताव अनिल परब यांच्याकडे सोपवला आहे. जर यासाठीही तुम्ही केंद्राकडे जाणार असाल, तर आपण सर्वजण मिळून जाऊ. मी याठिकाणी तुम्हाला वचन देतो की, मी त्यासाठी स्वत तिथे मुक्काम करेन आणि केंद्राने अनुमती दिली नाही, तर मी राजीनामा देईन आणि आयुष्यात निवडणूक लढणार नाही.

सत्तेसाठी लाचारी पत्करली नाही

संभाजी राजांवर धर्मांतरणासाठी असंख्य अत्याचार करण्यात आले. तरीही हा छावा नमला नाही, शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिला. राजेंनाही खुर्चीवर प्रेम करता आलं असतं, सत्तेसाठी लाचार होता आलं असतं. संभाजीराजेंना दख्खनची गादी देण्याचं सांगण्यात आलं होतं, पण त्यांनी अशा लाखो खूर्च्या मी आगीत भस्मसात करेन असं सांगितलं. प्रणाम त्या राजाला. असं म्हणत मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला टोला लगावला.

( हेही वाचा भाजपचे असेही गोवंश प्रेम! )

याआधीही बदलण्यात आली नावं

2011 मध्ये उडिसाचं ओडिसा केलं, पाॅंडिचेरीच पुंडिचेरी केलं. आता 2015 मध्ये दिल्लीतील औरंगजेब मार्गाचं नाव एपीजे अब्दूल कलाम मार्ग करण्यात आलं

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.