साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर आता डोंबिवलीतील बलात्काराच्या अमानुष घटनेमुळे महाराष्ट्र सुन्न झाला आहे. आधीच महिलांच्या सुरक्षेवरुन आक्रमक झालेल्या विरोधी पक्ष भाजपाने आता पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यपालांनी यासाठी दोन दिवसीय विशोष अधिवेशनाची सूचना केली असतानाच भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकार इतक्या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याचे म्हटले आहे. तसेच तुमची सत्ता सुरक्षित ठेवा पण राज्यातील महिलांच्या सुरक्षेवर चर्चा करा, असेही त्यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले मुनगंटीवार?
साकीनाका, डोंबिवली असे एक-एक करत राज्यातील स्त्रियांवरील अत्याचारांच्या घटना सांगायला सुरुवात केली तर आता 24 तास देखील कमी पडतील. त्यामुळे या विषयावर सरकारने दोन दिवस अधिवेशन बोलवून चिंतन करावे, अशी आमची सरकारला हात जोडून विनंती आहे. तुम्ही हजारो वर्षे सत्ते राहा, तुमची सत्ता सुरक्षित ठेवा. पण राज्यातील महिलांवर बलात्कार होत असताना तुम्ही या गंभीर विषयावर साधी चर्चा देखील करणार नाही, असा सवाल मुनगंटीवार यांनी विचारला आहे. इतर राज्यातील घटनांचं उदाहरण देऊन आपण राज्यातील घटनांकडे दुर्लक्ष करणे, हे बरोबर नाही. अशी जोरदार टीका मुनगंटीवार यांनी केली आहे.
(हेही वाचाः डोंबिवली हादरली! ३३ जणांनी केला ९ महिने बलात्कार)
फडणवीसांनी व्यक्त केला संताप
डोंबिवलीच्या भोपरमध्ये 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 33 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना ऐकून मन सुन्न झाले आहे. महिला अत्याचाराची सातत्याने वाढणारी ही प्रकरणे चीड आणणारी आहेत. डोंबिवलीसारख्या भागात अशी घटना घडणे अतिशय गंभीर आहे. यातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. आरोपींना जरब बसेल आणि अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, यासाठी राज्य सरकारने आता तरी तातडीने आणि गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
Join Our WhatsApp Community