इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा (Sam Pitroda) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहेत. आधी त्यांनी संपत्तीच्या वाटणीबाबत केलेल्या वक्तव्याने वाद पेटला होता, त्यानंतर आता त्यांनी देशातील नागरिकांच्या रंग आणि दिसण्यावरुन वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात त्यांनी भारताच्या विविध भागात राहणाऱ्या लोकांची चायनीज, आफ्रीकन आणि अरब लोकांशी तुलना केली.
कॉँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी देशातीलच विविध भागांतील जनतेचे वर्णभेदी वर्णन केले आहे. या वक्तव्यावरुन आता भाजपा आता आक्रमक झाली आहे. पित्रोदा यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. पित्रोदा (Sam Pitroda) यांच्या या वर्णद्वेषी टिप्पणीवरुन असामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा, केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर, भाजपा खासदार तेजस्वी सूर्या, भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांच्यासह विविध भाजपा नेते काँग्रेसवर जोरदार टीका करत आहेत.
(हेही वाचा PM Narendra Modi: सॅम पित्रोदांच्या वक्तव्याचा पंतप्रधान मोदींनी घेतला समाचार, म्हणाले…)
- असामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी पित्रोदांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना एक्सवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी म्हटले की, ‘सॅम भाई, मी उत्तर-पूर्वेत राहतो आणि भारतीयांसारखाच दिसतो. आम्ही एका विविधतेने नटलेल्या देशात राहतो. आम्ही वेगळे दिसतो, पण सर्वजण एकच आहोत. आमच्या देशाबद्दल थोडं जाणून घ्या.
- भाजपा नेते रवीशंकर प्रसाद म्हणाले, ‘यावरुन सिद्ध होते की, सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांना आपल्या भारत देशाबद्दल काहीच माहिती नाही. आता मला समजले की, राहुल गांधी मूर्खपणाची वक्तव्ये का करतात, कारण सॅम पित्रोदा राहुल गांधींचे सल्लागार आहेत, अशी टीका त्यांनी केली.
- भाजपा खासदार तेजस्वी सुर्या यांनी तर पित्रोदांची तुलना थेट चर्चिलशी केली. तेजस्वी सुर्या म्हणाले की, ‘काँग्रेस नेहमी ओजी (ओरिजनल) ब्रेकिंग भारतीय पक्ष राहिला आहे. अशा प्रकारची टीका चर्चिलने आपल्या देशाबद्दल केलेल्या टीकेसारखीच आहे. यात काही आश्चर्य नाही की, राहुल गांधी पित्रोदांकडूनच मार्गदर्शन घेतात.
- ‘भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी पित्रोदांना (Sam Pitroda) निलंबित करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, ही वर्णद्वेषी आणि अपमानकारक टिप्पणी आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यावरुन कळते की, काँग्रेसच्या ‘मोहब्बत की दुकान’मध्ये ‘नफरत का सामान’ भरलेले. जोपर्यंत काँग्रेस यावर स्पष्टीकरण देत नाही, तोपर्यंत सॅम पित्रोदा यांना पक्षातून निलंबित करावे. राहुल गांधींचे गुरू अशाप्रकारची वक्तव्ये करतात, अशी टीका त्यांनी केली.
Join Our WhatsApp Community