Rahul Gandhi यांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नासारख्या गंभीर कलमांखाली तक्रार दाखल

126
Rahul Gandhi यांनी पुन्हा ओकली गरळ; म्हणाले...

संसदेत झालेल्या धक्काबुक्कीवरून राजकीय वातावरण तापलेले आहे. भाजपाने राहुल गांधींनी (Rahul Gandhi) आपल्या खासदारांना धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे, ज्यात दोन खासदार जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिला खासदाराने राहुल गांधींवरही आरोप केले आहेत. या धक्काबुक्कीच्या घटनेबाबत भाजपा (BJP) आणि काँग्रेस (Congress) या दोन्ही पक्षांनी संसद मार्ग पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. भाजपाने आपल्या तक्रारीत राहुल गांधीवर (Rahul Gandhi) खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

( हेही वाचा : Ashwin Retires : अश्विनने कर्णधार रोहितचं म्हणणं खोडून काढलं तेव्हा…

भाजपाने संसद मार्ग पोलिस ठाण्यात राहुल गांधींविरोधात (Rahul Gandhi) तक्रार दाखल केली आहे. यानंतर भाजपा खासदार अनुराग ठाकूर (Anurag Thakur) म्हणाले की, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना कायद्याचे उल्लंघन करण्याची सवय आहे. त्यांच्या हाणामारीत दोन खासदार पडले आणि जखमी झाले. याबाबतची तक्रार खुनाच्या प्रयत्नाच्या कलमांतर्गत दाखल करण्यात आली आहे. बीएनएस कलम १०९ अंतर्गत तक्रार देण्यात आल्याची ही ठाकूर म्हणाले. तसेच भाजपा खासदार प्रताप सारंगी यांचा रक्तदाब उच्च असल्याची माहिती आरएमएल एमएस डॉ. अजय शुक्ला यांनी दिली.

बीएनएसच्या या कलमांखाली राहुल गांधींविरुद्ध तक्रार

कलम १०९ : हत्येचा प्रयत्न
कलम ११५ : दुखापत करणे
कलम ११७ : गंभीर दुखापत करणे
कलम १२१ : सरकारी कर्मचाऱ्याचे त्याच्या कर्तव्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी दुखापत करणे
कलम ३५१ : गुन्हेगारी धमकी
कलम १२५ : इतरांची सुरक्षा धोक्यात आणणे

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.