२५ वर्षे भ्रष्टाचार करणाऱ्यांका घरात बसान दे!

138

कोकणवासियांची श्रध्दा असलेल्या आंगणेवाडीतील भराडी देवीचे दर्शन भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, भाजपा नेते आमदार अँड. आशिष शेलार आणि पालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी घेतले. याप्रसंगी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी असलेल्या शेलार यांनी २५ वर्षे भ्रष्टाचार करणाऱ्यांका घरात बसान दे, असे साकडे घातले असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले.

कोकणातील राजकीय नेते हजेरी लावतात

कोकणवासियांची अपार श्रद्धा असलेल्या भराडी देवीची जत्रा सुरू झाली असून गुरुवारी आमदार आशिष शेलार यांनी आंगणेवाडीला जाऊन दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि महापालिकेचे गटनेते प्रभाकर शिंदे हे उपस्थित होते. कोकणातील राजकीय नेते आवर्जून या यात्रेत हजेरी लावून दर्शन घेत असतात. ही देवी नवसाला पावणारी असल्याची श्रध्दा असल्याने देवीकडे कोणी काय मागणे मागितले यावर याबाबतची रंगतार चर्चा राजकीय वर्तुळात होत असते.

BJP 1 1

याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलतांना शेलार हे मालवणी भाषेत उत्तर देताना ते म्हणाले की,

माझ्या भराडी देवी माते कौल दे…, मुंबई महापालिकेत आमका यश यवं दे…, टक्केवारी, लुटमार करतले ते हरान दे, मुंबैकराची ईडापीडा टळानं दे, या येळेस…आणि २५ वर्षे भ्रष्टाचार करणाऱ्यांका घरात बसान दे…चाकरमान्यांचे मुंबईत हाल करणाऱ्यांका तेंची जागा दाखन दे!…माते कौल दे!!…असे साकडे घातल्याचे त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.