बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत रत्नागिरीत (BJP leaders Ratnagiri Visit) शुक्रवार १ मार्च रोजी भाजपचा कार्यकर्ता मेळावा होणार आहे. मंत्री चव्हाण यांच्या पाठोपाठ २ मार्च रोजी चित्रा वाघ, तर ३ मार्चला लोकसभा प्रभारी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा रत्नागिरी दौरा होणार असल्याने भाजपामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
(हेही वाचा – Ajit Pawar यांनी काका आणि बहिणीला बारामतीतच का गुंतवले ?)
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपाचा दावा
देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे (BJP leaders Ratnagiri Visit) वारे वाहू लागले आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपाने दावा केला आहे. अजून कोणालाही उमेदवारी जाहीर झालेली नाही. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील तीन दिवसांत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा वाघ आणि लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी व गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत दौऱ्यावर येत आहेत. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपाच्या कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक शुक्रवारी होणार आहे. या वेळी अन्य पक्षांतील कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश होणार आहे. हा कार्यक्रम स्वयंवर मंगल कार्यालयात दुपारी १२.३० वाजता होणार आहे, अशी माहिती रत्नागिरी विधानसभा क्षेत्रप्रमुख तथा लोकसभा मतदारसंघाचे सहप्रभारी बाळ माने यांनी दिली.
रेल्वे स्थानक सुशोभीकरण प्रकल्पाबाबत आढावा बैठक
रवींद्र चव्हाण (BJP leaders Ratnagiri Visit) यांच्या उपस्थितीत शुक्रवारी दुपारी २ वाजता शासकीय विश्रामगृहात सार्वजनिक बांधक मंडळ अंतर्गत कामांची बैठक, २.३० वाजता रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेल्वे स्थानक सुशोभीकरण प्रकल्पाबाबत आढावा बैठक होणार आहे. त्यानंतर ३ वाजता जिल्ह्यातील विविध विकासकामांचे आभासी पद्धतीने भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. सायंकाळी ४ वाजता शिक्षकांच्या विविध प्रश्न मागण्यांसंबंधी जिल्हा शिक्षक पतपेढीत मंत्री उपस्थित राहतील.
(हेही वाचा – Sharad Pawar : मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शरद पवारांकडून जेवणाचे निमंत्रण)
चित्रा वाघ रत्नागिरी दौऱ्यावर :
चित्रा वाघ २ मार्च रोजी रत्नागिरी दौऱ्यावर असणार आहेत. लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी व गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा ३ मार्च रोजी रत्नागिरीत दौरा आहे. कमळ निशाणीवरच लोकसभा निवडणूक जिंकण्याचा इरादा भाजपाने केला आहे. त्यादृष्टीने हे तिन्ही दौरे महत्त्वाचे मानले जात आहेत. (BJP leaders Ratnagiri Visit)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community