अपशब्द वापरणं ही राऊतांची संस्कृतीच! भाजप नेत्यांचे टीकास्त्र

104

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत विरोधकांना अनेक आरोप केले. त्यांच्या पत्रकार परिषदेत कोणचे गौप्यस्फोट होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी ईडीच्या कारवाईवर सुद्धा राऊतांनी सडकून टीका केली. ‘ये तो बस ट्रेलर है’ असे सांगत संजय राऊतांनी विरोधकांना इशारा दिला आहे. या पत्रकार परिषदेसंदर्भात राजकीय पातळीवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. या परिषदेनंतर भाजपच्या अनेक नेत्यांंनी राऊतांना प्रतिउत्तर देत पलटवार केला आहे.

( हेही वाचा : सरकार पाडण्यासाठी ईडीच्या धाडी! संजय राऊतांचा आरोप )

अपशब्द वापरणं ही यांची संस्कृती

न्यायालय हे उत्तम माध्यम आहे. संजय राऊतांनी न्यायालयात जायला हवं, गेले २७ महिने आम्ही न्यायालयाच्या न्यायामुळेच टिकून आहोत. महाविकास आघाडी अजून एकही केस जिंकू शकले नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे अपशब्द वापरणे ही यांची संस्कृती अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करत केली आहे.

भ्रष्टाचाराविरुद्ध आमचा लढा सुरूच राहणार 

आम्ही काही चुकीचे केलेले नाही. मी या निर्णयाचे स्वागत करतो. राऊत प्रवीण राऊत, सुजीत पाटकर यांच्या संबंधांविषयी काहीच म्हणाले नाहीत असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध आमचा लढा सुरूच राहणार आहे असे किरीट सोमय्यांनी ट्वीट करत स्पष्ट केले आहे.

संजय राऊतांची परिषद ठरली फुसका बार

संजय राऊतांची आजची परिषद फुसका बार ठरला आहे. परिषदेत राऊतांनी तथ्यहीन आरोप केले आहेत. सोमय्यांना टार्गेट करण्याचा राऊतांनी केविलवाणा प्रयत्न आहे. सोयीचे घ्यायचे अन् सोयीचे विसरायचे ही त्यांची ठरलेली रणनीती आहे, अशी टीका प्रविण दरेकरांनी राऊतांवर केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.