- प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत बारामती वगळता आपल्या कोट्यातील एकही जागा न सोडणाऱ्या भाजपाला (BJP) विधानसभा निवडणुकीवेळी किमान २० जागांवर पाणी सोडावे लागण्याची चिन्हे आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने यापैकी ५ जागा फार कमी मताच्या फरकाने गमावल्या होत्या. त्यामुळे अजित पवार गटाशी जागावाटप करताना भाजपाने सावध पवित्रा घेतल्याचे समजते.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने (BJP) अजित पवार गटाला बारामती, शिरूर, रायगड आणि परभणी या चार जागा दिल्या होत्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या चारपैकी बारामतीची जागा भाजपाने लढवली होती. तर शिरूर, परभणी आणि रायगडची जागा तेव्हाच्या एकसंघ शिवसेनेने लढवली होती. त्यामुळे लोकसभेला महायुतीच्या जागावाटपात भाजपाचे (BJP) अजिबात नुकसान झाले नव्हते. लोकसभेला कमी जागा वाट्याला आल्याने अजित पवार गटाने महायुतीत विधानसभेच्या ८० ते ९० जागांचा आग्रह धरला आहे. खुद्द अजित पवार यांनी राष्ट्रवादीला ६० पेक्षा अधिक जागा मिळतील, असे जाहीर केले आहे.
(हेही वाचा – ‘दहशतवादाला जमिनीत गाडून टाकू..’, Amit Shah यांचा किश्तवाडमध्ये एनसी-काँग्रेसवर हल्लाबोल)
आगामी विधानसभा निवडणुकीत विद्यमान जागा त्या त्या पक्षाने लढवाव्यात, असे सूत्र महायुतीने जवळपास निश्चित केले आहे. काही अपवाद वगळता जागांची अदलाबदल केली जाणार आहे. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत जिंकलेल्या जागा संबंधित पक्षाकडे कायम राहिल्या तर भाजपाला (BJP) गेल्यावेळी लढवलेल्या जवळपास २० जागा अजित पवार गटाला सोडाव्या लागतील. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत या २० पैकी निम्म्याहून जास्त जागा भाजपाने जिंकल्या होत्या. त्यामुळे महायुतीत राष्ट्रवादीला जागा सोडताना भाजपाला काही जागांचा त्याग करावा लागणार आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने कमी फरकाने गमावलेल्या जागा
कोपरगाव
राष्ट्रवादी काँग्रेस : ८७ हजार ५६६ (विजयी)
भाजपा : ८६ हजार ७४४ (पराभूत)
राष्ट्रवादी काँग्रेस : ७२ हजार ४०० (विजयी)
अर्जुनी मोरगाव
भाजपा : ७१ हजार ६८२ (पराभूत)
वडगाव शेरी
राष्ट्रवादी काँग्रेस : ९७ हजार ७०८
भाजपा: ९२ हजार ७५२
(हेही वाचा – Assembly Election जवळ आल्याने Samajwadi ही गणपती बाप्पाच्या दारात!)
हडपसर
राष्ट्रवादी काँग्रेस : ९२ हजार ३२६
भाजपा : ८९ हजार ५०६
इंदापूर
राष्ट्रवादी काँग्रेस : १ लाख १४ हजार ९६०
भाजपा : १ लाख ११ हजार ८५०
भाजपाच्या (BJP) या त्यागामुळे पक्षात असंतोष असून राजकीयदृष्ट्या तगडे इच्छुक उमेदवार महाविकास आघाडीशी संधान ठेवून आहेत. पश्चिम महाराष्ट्रात कागलचे समरजित घाटगे यांनी भाजपाला रामराम ठोकून तुतारी हातात घेतली आहे. हर्षवर्धन पाटील, माजी आमदार संजय भेगडे, वैभव पिचड, बीड जिल्ह्यातील रमेश आडसकर आदी स्थानिक नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबतच्या विधानसभा जागावाटपात भाजपाची कसोटी लागली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community