2024 साठी भाजपची मोर्चेबांधणी सुरू, असा आहे प्लॅन

177

मोदी सरकारला केंद्रात आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. याबाबत देश-विदेशातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे कौतुक होत असताना, आता भाजपने 2024च्या लोकसभा निवडणुकांसाठी तयारीला सुरुवात केली आहे. यासाठी 2019च्या निवडणुकांमध्ये ज्या जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले होते त्या जागांवर भाजपने आपले लक्ष केंद्रित केले आहे. देशभरातील अशा एकूण 144 लोकसभा जागांसाठी भाजपने आता मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. भाजपचे सरचिटणीस बी एल संतोष यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

असा आहे प्लॅन

याठिकाणी केंद्रीय मंत्र्यांसाठी मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क अभियानाचं भाजपकडून आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. पहिल्या टप्प्यात भाजप 144 लोकसभा जागा आणि त्याअंतर्गत येणा-या विधानसभा जागांबाबत माहिती घेणार असून, या जागांवर बूथ मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येणार आहेत.

(हेही वाचाः Income Tax भरताना आता ही माहिती सुद्धा द्यावी लागणार, आयकर विभागाचे नवे नियम)

असे होणार काम

पुढील 18 महिने भाजप या जागांवर काम करणार आहे. यासाठी तीन स्तर निश्चित केले जातील. पहिल्या स्तरात एक केंद्रीय समिती स्थापन करण्यात येणार असून, त्यात भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांचा समावेश असणार आहे. ही समिती या संपूर्ण कार्यक्रमाची देखरेख करणार आहे. दुस-या स्तरावर एक समिती राज्य स्तरावर काम करणार असून, या समितीच्या माध्यमातून योजनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जाणार आहे. तर तिस-या स्तरावर असणा-या क्लस्टर समितीमध्ये केंद्रीय मंत्र्यांचा समावेश असणार आहे. ही समिती संपूर्ण कामकाजाची पाहणी करणार आहे, तसेच केंद्र आणि राज्य स्तरांवर स्थापन झालेल्या समितींमध्ये समन्वय साधण्याचे काम करणार आहे.

प्रभारींवर मोठी जबाबदारी

आखण्यात आलेल्या या योजनेनुसार, पक्षाचे संघटनात्मक प्रभारी दर 15 दिवसांतून एकदा प्रत्येक लोकसभा मतदारसंघांना भेट देणार आहेत. तर लोकसभा प्रभारी पहिले दोन महिने या लोकसभा मतदासंघांतर्गत येणा-या प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील लोकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. याआधारे पक्षाच्या बाजूने आणि पक्षाच्या विरोधात असणा-या मुद्द्यांचा डेटा तयार करण्याची जबाबदारी या प्रभारींवर सोपवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचाः ‘पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा करणा-यांनी…’, राऊतांनी मराठा संघटनांना सुनावले)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.