- सुजित महामुलकर
भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्य प्रवक्ते माधव भंडारी (Madhav Bhandari) यांचे पुत्र चिन्मय यांनी आपल्या वडिलांबाबत एक भावनिक पोस्ट ‘X’ या समाजमाध्यमावर (Social Media) पोस्ट केली असून त्यांनी पक्षावर कोणतीही टीका न करता वडिलांवर झालेल्या अन्यायाला (Injustice) वाचा फोडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. (BJP)
या पोस्टमध्ये सुरुवातीलाच त्यांनी हे आपले वैयक्तिक विचार असल्याचे स्पष्ट केले आहे. (BJP)
This is a deeply personal post, and it is my personal thought process.
Not many know that I am @Madhavbhandari_ (Madhav Bhandari, Vice President of BJP Maharashtra) son.
Today, I want to write about my father.
My father joined the Jansangh/Janata Party in 1975, a few years… pic.twitter.com/SHMzOtwFHn
— Chinmay Bhandari (@iTsChinmay) February 15, 2024
५० वर्षे निस्वार्थ सेवा
आपले वडील माधव भंडारी हे १९८० मध्ये भाजपच्या स्थापनेपूर्वीपासून म्हणजेच जनसंघ, जनता पार्टी अस्तित्वात असल्यापासून (१९७५) जवळपास गेली ५० वर्षे पक्षात कार्यरत असल्याचे नमूद केले आहे. त्यांचे पक्षकार्य, पक्षनिष्ठा, निस्वार्थ सेवा याचा आढावा या पोस्टमधून घेतला आहे. (BJP)
पदं मिळूनही अन्याय झाल्याची ओरड
भंडारी यांच्या निस्वार्थ सेवेची काही उदाहरणे देतानाच चिन्मय यांनी त्यांचे नाव १२ वेळा विधानसभा (Assembly) किंवा विधान परिषदेसाठी (Legislative Council) चर्चेत होते मात्र कधीही अंतिम यादीत आले नसल्याची खंत व्यक्त केली. तसेच अनेकांना मंत्रीपद (Minister), खासदारकी (Member of Parliament) मिळूनही थोडे गमवावे लागले की अन्याय झाल्याची ओरड केल्याचे आपण पाहिल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचवेळी त्यांनी पक्ष नेतृत्वावरही (Leadership) विश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्यावर अन्याय होऊनही त्यांनी कधी याची वाच्यता केली नाही किंवा पक्षाला दुखावले नाही. तसेच यापुढेही ते पक्षाचे कार्य असेच पुढे सुरु ठेवतील, असेही चिन्मय यांनी म्हटले आहे. (BJP)
(हेही वाचा – UBT Group च्या बड्या नेत्याने घेतली भाजप मंत्र्यांची भेट; बंद दाराआड चर्चा)
‘राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी मी’ हेच धोरण
ही एक प्रतिनिधीक पोस्ट असून अशाच भावना अनेक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होताना दिसत आहेत. याबाबत पक्षाचे प्रदेश प्रवक्ते पंकज मोदी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “देशाला पुढे नेण्यासाठी आणि विकासाच्या मार्गावर जात असतांना अनेकांची साथ आवश्यक असते. त्यांना सोबत घेऊन पक्ष पुढे वाटचाल करत आहे आणि पक्षाचे धोरण आहे की ‘राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी मी’ (Nationa first, self second and self last). मात्र पक्ष सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो,” असे सांगून त्यांनी नुकतेच राज्यसाभेसाठी डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी देऊन हे सिद्ध केल्याचे स्पष्ट केले. (BJP)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community