महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते नवाब मलिक यांना मनी लाॅंड्रिंग प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आली आहे. नुकतीच त्यांच्या न्यायालयीन कोठडीतही वाढ करण्यात आली. मलिकांना अटक झाल्यापासून भाजप मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. आता भाजपाने ट्वीट करत, मलिकांच्या या पराक्रमाची माहिती राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना माहिती नव्हती का?, असा सवाल केला आहे.
मलिकांच्या कामगिरीची माहिती नाही का?
मलिकांना अटक झाल्यानंतर, भाजपाने मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही सतत आंदोलन करत भाजप नवाबांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. आता भाजप महाराष्ट्रने ट्विट करत, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना टोला लगावला आहे. “आतंकवादी दाऊदने हडप केलेली जमीन मंत्री मलिकांना विकण्याचा बनाव करण्यात आला. त्या जमिनीच्या माध्यमातून मिळणारे आर्थिक इनकम हे दाऊदच्या ‘टेरर फंड’ ऍक्टिव्हिटीसाठी वापरले जात होते. मोठ्या साहेबांना नवाब मलीकांच्या पराक्रमाची माहिती नव्हती का? असा सवाल महाराष्ट्र भाजपकडून करण्यात आला आहे.
( हेही वाचा: ‘त्या’बद्दल फडवणीसांचं कौतुक करायला हवं! काय म्हणाले शरद पवार? )
…म्हणून अटक
अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंधित मनी लाॅंड्रिंग प्रकरणात सक्त वसुलीने संचालनालयाने (ईडी) राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना तब्बल साडेसात तासांच्या चौकशीअंती 23 फेब्रुवारीला अटक केली.
Join Our WhatsApp Community