विधान परिषदेच्या ‘त्या’ १७ जागा भाजपचे बिघडवणार गणित?

116

पुढच्या वर्षी विधान परिषदेचे १७ सदस्य निवृत्त होणार आहेत. त्यामध्ये १० आमदार हे विधानसभेच्या आमदारांच्या सदस्यांमधून निवडून येत असतात. या १७ आमदारांमध्ये ८ भाजपचे आमदार आहेत. त्यातील भाजपाचे ४ आमदार हे विधानसभेतून निवडून येणार आहेत. तर ४ आमदार हे स्थानिक स्वराज्य संस्थेमधून निवडून येणार आहेत. सध्याचे विधानसभेचे बहुमताचे गणित पाहता भाजपच्या १०५ विरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचे संख्याबळ १७५ इतके आहे. तसेच जर स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येणा-या जागांसाठीही महाविकास आघाडी कायम राहिली, तर मात्र याचा जबरदस्त फटका भाजपाला बसेल, भाजपचे विधान परिषदेतील गणित बिघडणार आहे.

(हेही वाचा ‘महापौर पेडणेकरांसह कुटुंबाला ठार मारणार’)

महाविकास आघाडीची एकी राहिली, तर…

निवृत्त होणारे दहा आमदार हे विधानसभा सदस्यांमधून निवडून आलेले आहेत, तर उर्वरित सात हे स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघातील आहेत. नवीन वर्षात होणाऱ्या या निवडणुकीमुळे विधान परिषदेतील राजकीय चित्र पूर्णपणे बदलणार आहे. विधानसभा सदस्यांमधून निवडून येणाऱ्या दहा जागांसाठी राज्यातील बदललेले राजकीय चित्र परिणामकारक ठरणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे चार, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन, तर काँग्रेसचा एक सदस्य निवडून येऊ शकतो. दहाव्या जागेसाठी चुरस असेल. काँग्रेसकडील अतिरिक्त मते आणि अपक्षांच्या मदतीने महाविकास आघाडीकडून पुरस्कृत करण्यात येणारा उमेदवार निवडून येऊ शकतो. महाविकास आघाडी सहा, तर भाजपचे चार उमेदवार निवडून येतील, असे गणित आहे. स्थानिक प्राधिकारी संस्थेच्या सात मतदारसंघातील निवडणुकीत चुरस असेल. पुढील वर्षी ठाणे, पुणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, भंडारा – गोंदिया व यवतमाळ मतदारसंघांतील आमदारांची मुदत संपुष्टात येत आहे. या बरोबरच नगर आणि सोलापूर स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघातील लांबणीवर पडलेली निवडणूकही पुढील वर्षात होईल.

निवृत्त होणारे सदस्य

भाजप

प्रवीण दरेकर (विरोधी पक्षनेते), सदाभाऊ खोत, सुजिर्तंसह ठाकूर , विनायक मेटे, प्रसाद लाड, रामनिवास सिंह, चंदुभाई पटेल, परिणय फुके

शिवसेना

उद्योगमंत्री सुभाष देसाई, दिवाकर रावते,  रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी.

राष्ट्रवादी काँग्रेस

संजय दौंड, सभापती रामराजे नाईक निंबाळकर, अनिल भोसले

काँग्रेस

मोहन कदम , अमर राजूरकर

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.