BJP : ‘तिकीट मिळेल आणि आपल्या कामावर निवडून येऊ, या भ्रमात राहू नका’: भाजपच्या आमदारांची कानउघडणी

यशामुळे हुरळून गेलेल्या महाराष्ट्रातील आमदारांचे पक्षाने चांगलेच कान टोचले.

194
उत्तर प्रदेशात BJP का हरली? भाजपा टास्क फोर्सच्या अहवालात आले समोर
  • सुजित महामुलकर

नुकत्याच पार पडलेल्या चारपैकी तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीत (राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ) भारतीय जनता पक्षाला (Bharatiya Janata Party) घवघवीत यश मिळाले. या यशामुळे हुरळून गेलेल्या महाराष्ट्रातील आमदारांचे पक्षाने चांगलेच कान टोचले. ‘आम्ही आमच्या कामावर निवडून येऊ शकतो’ या भ्रमात आमदारांनी राहू नये तर ‘जानेवारी २५ पर्यंत ‘रिझल्ट’ द्या नाहीतर विधानसभेचे तिकीट कापले जाईल’, अशा शब्दात आमदारांची कानउघडणी करण्यात आली आहे. (BJP)

आमदारांची झाडाझडती

राज्याचे हिवाळी अधिवेशन (Winter session) नागपूर येथे सुरु असून गुरुवारी सकाळी भाजपने आपल्या आमदारांची बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्या शासकीय निवासस्थानी ‘देवगिरी’ बंगल्यावर घेतली. या बैठकीत फडणवीस यांनी सर्व आमदारांच्या कामाचा पाढा वाचला आणि झाडाझडती घेतली. (BJP)

नवीन चेहेऱ्याच्या संधीची गोष्ट

आपल्या आमदारांना मार्गदर्शन करताना फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी अन्य एका राज्यातील उदाहरण देताना सांगितले की “पक्ष तिकीट देईल आणि आपण आपल्या कामावर सहज निवडून येऊ, या भ्रमात राहू नका. नुकत्याच पार पडलेल्या एका राज्याच्या निवडणुकीदरम्यान एका आमदाराचा कार्यअहवाल असमाधानकारक होता. मात्र त्या आमदाराने दावा केला की तो १०० टक्के निवडून येईल. पण वरिष्ठांकडून त्याला तिकीट नाकारले गेले आणि एका नवीन चेहेऱ्याला संधी दिली गेली. आम्ही ‘त्या’ जागेवर लक्ष ठेऊन होतो आणि तो नवीन चेहेरा अपेक्षेपेक्षा जास्त मतांनी निवडून आला,” असा किस्सा फडणवीस यांनी सांगितल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. (BJP)

(हेही वाचा – PM Svanidhi Mumbai Hawkers : दुसऱ्या टप्प्यातील पीएम स्वनिधीला फेरीवाल्यांचा अल्प प्रतिसाद)

गैरहजेरीबद्दल विचारणा

काही दिवसांपूर्वी मुंबईत राष्ट्रीय अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये भाजपची एक बैठक पार पडली. त्यामध्ये काही आमदार गैरहजर होते त्यांचीही कानउघडणी या बैठकीत केली गेली. आणि या आमदारांना लोकसभेसाठीची काही उद्दिष्ट देण्यात आली. (BJP)

आमदारांना कामाला लावले

भाजपने आपल्या आमदारांना काही उद्दिष्ट २५ जानेवारीपर्यंत साध्य करण्यास सांगितली. यात नमो ऍप डाऊनलोड करून घ्यावे, प्रत्येक आमदाराने त्याच्या मतदार संघात किमान ३०,००० नमो ऍप कार्यकर्त्यांकडून डाऊनलोड करावे, आमदारांनी रोज सकाळी किमान पाच मिनिट या ऍपवर घालवावी, मतदारसंघात १५० बूथ प्रमुख तयार करा, अशा सूचना आमदारांना देण्यात आल्या. (BJP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.